Paytm Share Price | पेटीएम शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस केली जाहीर, डिटेल्स जाणून घ्या
Paytm Share Price | वन 97 कम्यूनिकेशन्स कंपनीचे शेअर जून तिमाहीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 808 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे.
मात्र अनेक ब्रोकरेज फर्म पेटीएम कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहे. ब्रोकरेज फर्म CLSA ने पेटीएम स्टॉकची लक्ष किंमत 1,050 रुपये निश्चित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 765.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पेटीएम कंपनीचा IPO 2021 साली शेअर बाजारात 2150 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. सध्या मात्र शेअरची किंमत आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 62 टक्के घसरली आहे. सीएलएसए फर्मच्या मते, जून 2023 तिमाहीत पेटीएम कंपनीची एकूण व्यापारी मूल्य वाढ स्थिर राहिली आहे. पेटीएम कंपनीचा EBITDA प्रमाण ESOPs वगळून तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा चांगला नोंदवला गेला आहे. Goldman Sachs च्या मते पेटीएम कंपनी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत भारतातील सर्वात फायदेशीर इंटरनेट कंपनी म्हणून नावारूपाला येऊ शकते. म्हणून तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 1,200 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
गोल्डमन सॅक्सच्या तज्ञांच्या मते, पेटीएम कंपनीच्या मार्च 2023 तिमाही निकालानंतर तज्ञांनी पेटीएम कंपनीच्या कर्जदरात घट झाल्याने चिंता व्यक्त केली होती. जून 2023 तिमाहीत कंपनीचे कर्ज प्रमाण 3.5 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. मार्च तिमाहीत हे प्रमाण 3.8 टक्के होते. जेपी मॉर्गन फर्मच्या तज्ञांनी पेटीएम कंपनीच्या शेअरवर 950 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
पेटीएम कंपनीच्या एप्रिल-जून 2023 तिमाहीत कंपनीला 358.4 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. पेटीएम कंपनीच्या म्हणण्यानुसार आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या तोट्यात घट पाहायला मिळत आहे. जून 2023 तिमाहीत पेटीएम कंपनीचे परिचालन उत्पन्न 39.4 टक्क्यांच्या वाढीसह 2,341.6 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्न 1,679.6 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Paytm Share Price today on 28 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल