22 January 2025 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

Paytm Stock Price Declined | IPO नंतर पेटीएम शेअर्समध्ये घसरण सुरूच

Paytm Stock Price Declined

मुंबई, २२ नोव्हेंबर | पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स नुकतेच स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाझाले होते, त्यात सलग दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. आज सोमवारीच सुरुवातीच्या ट्रेड दरम्यान, त्यात सुमारे 18 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. बीएसईवर, पेटीएमच्या शेअर्समध्ये 17.85 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आणि त्याचे शेअर्स प्रति शेअर 1,286 रुपयांवर व्यवहार करताना दिसले. NSE वर देखील Paytm चे शेअर 17.99 टक्क्यांनी घसरले आणि ते 1280 रुपयांवर व्यवहार करत होते. दोन दिवसांच्या घसरणीमुळे कंपनीचे (Paytm Stock Price Declined) बाजार भांडवल 50,000 कोटी रुपयांनी खाली आले आहे.

Paytm Stock Price Declined. Shares of Paytm’s parent company One97 Communications, which was recently listed on stock exchanges, also saw a decline for the second consecutive trading session :

तत्पूर्वी म्हणजे गुरुवारी, 18 नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजवर One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या समभागांची कमकुवत लिस्टिंग झाली होती. इश्यू किमतीच्या तुलनेत गुरुवारी त्याचे शेअर्स 27 टक्क्यांपर्यंत घसरले होते.

अँट ग्रुप- सपोर्टेड पेटीएमचा रु. 18,300 कोटीचा IPO हा भारतातील आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO होता. तो 1.89 वेळा सबस्क्राईब झाला होता. या आयपीओचा आकार कोल इंडियाच्या १५,००० कोटी रुपयांपेक्षा मोठा होता. कोल इंडियाचा आयपीओ दशकभरापूर्वी आला होता. वन97 कम्युनिकेशन्सने 2000 मध्ये काम सुरू केले. ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी ही देशातील आघाडीची डिजिटल इकोसिस्टम कंपनी आहे.

one97-communications-share-price

गुरुवारी जेव्हा One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स तुटले, तेव्हा भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी चांगलीच टिप्पणी केली. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, “मी त्या सर्व गुंतवणूकदारांसोबत आहे ज्यांनी पेटीएममध्ये आपले पैसे ठेवले आहेत. मला खात्री आहे की पेटीएमचे शेअर्स लवकरच पुनरागमन करतील. शेअर लिस्टची संथ सुरुवात म्हणजे सिल्व्हर लाइनिंग आहे. हे कॅसिनो गेमसारखे आहे, ज्यामध्ये पैज कधीही चालू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Paytm Stock Price Declined second day after listed on stock exchanges.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x