17 April 2025 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

PB Fintech Share Price | मस्तच! अवघ्या 5 दिवसात शेअरने 15% परतावा दिला, या स्टॉकची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी सुरु

PB Fintech Share Price

PB Fintech Share Price | ‘पीबी फिनटेक’ ही पॉलिसीबाजारची मूळ कंपनी असून तिचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 572.35 रुपये या पाच महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहे. बीएसई इंडेक्सवर शुक्रवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये ‘पीबी फिनटेक’ कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. ‘पीबी फिनटेक’ कंपनीचा स्टॉक 13 सप्टेंबर 2022 च्या सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचला आहे. पॉलिसीबाजार कंपनीच्या शेअर्सनी सलग पाचव्या दिवशी तेजी टिकवून ठेवली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 15 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तर त्या तुलनेत S&P BSE सेन्सेक्समध्ये 2 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. ‘पीबी फिनटेक’ कंपनीचे शेअर्स 1,470 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 69 टक्के खाली ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)

कंपनीच्या शेअर्सच्या वाढीचे कारण :
‘पीबी फिनटेक’ कंपनीच्या शेअर्समध्ये जी वाढ होत आहे, त्यासाठी एक सकारात्मक बातमी जबाबदार आहे. ‘पीबी फिनटेक’ कंपनीचे सीईओ ‘यशिश दहिया’ यांनी एका मुलाखतीत 2027 पर्यंत कंपनी 1000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवेल अशी अपेक्षा व्यक्त केली, आणि स्टॉकमध्ये ही तेजी सुरू झाली. 2026-2027 पर्यंत कंपनी एक हजार कोटींचा नफा मिळवेल असे वक्तव्य कंपनीच्या सीईओने करताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. ‘पीबी फिनटेक’ कंपनीला डिसेंबर 2022 तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीला 298 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक 66 टक्के वाढीसह 610 कोटी रुपयेवर गेला आहे.

म्युच्युअल फंड हाऊसनी गुंतवणुक केली
देशातील टॉप म्युच्युअल फंड हाऊसनी या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. खरेतर फ्रँकलिन टेम्पलटन कंपनीने पॉलिसी मार्केट ऑपरेटर म्हणून ओळखली जाणारी कंपनी म्हणजेच ‘पीबी फिनटेक लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे.

522 कोटी रुपयांच्या शेअर्सची उलाढाल :
नुकताच ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ फर्मने पॉलिसीबाझार कंपनीची मूळ कंपनी ‘पीबी फिनटेक’ चे 522 कोटी रुपयांचे शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. दरम्यान ‘WF Asian Reconnaissance Fund’ ने देखील ‘PB फिनटेक’ कंपनीचे 50 लाख शेअर्स खरेदी केल्याची माहिती NSE च्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळत आहे. ‘पीबी फिनटेक’ कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PB Fintech Share Price 543390 POLICYBZR in focus check details on 25 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

PB Fintech Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या