17 April 2025 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

PB Fintech Share Price | मालामाल करतोय शेअर! अवघ्या दोन महिन्यात 52 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

PB Fintech Share Price

PB Fintech Share Price | पॉलिसी बाजार आणि ICICI लोंबार्ड या कंपनन्यानी करार केला आहे. त्यामुळे पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 1359.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 1351 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर काही तासात हा स्टॉक 1400.35 रुपये या आपल्या दोन वर्षांच्या उच्चांक किंमतीवर पोहचला होता. ( पीबी फिनटेक कंपनी अंश )

ICICI लोम्बार्ड कंपनीने पॉलिसीबझार कंपनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सेवा सूचीबद्ध करण्यासाठी धोरणात्मक करार केला आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी पीबी फिनटेक स्टॉक 3.22 टक्के वाढीसह 1,345 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या नोव्हेंबर 2021 च्या सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. 17 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 1,470 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 1,713 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पॉलिसीबझार ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन विमा प्लॅटफॉर्म सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. पीबी फिनटेक ही कंपनी मोटार, आरोग्य, पीक, आग, वैयक्तिक अपघात, सागरी, अभियांत्रिकी विमा यासह अनेक वितरण प्लॅटफॉर्मद्वारे विस्तृत आणि वैविध्यपूर्ण विमा सेवा ऑफर करते.

पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स मागील दोन महिन्यात 52 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

पीबी फिनटेक कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 37 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 87 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. पीबी फिनटेक कंपनीने एक कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. या विमा कंपनीने मोटार विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा, गृह विमा आणि व्यवसाय विमा यासह विमा उत्पादनांच्या विस्तृत सेवा एक कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष निश्चित केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PB Fintech Share Price NSE Live 11 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

PB Fintech Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या