19 November 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stock Magic | एक बातमी आणि पैशाचा पाऊस, हा 13 रुपयांचा पेनी शेअर 1 दिवसात 20% परतावा देत आहेत, स्टॉक नेम?

Penny Stock magic

Penny Stock Magic | साखर उत्पादन करणाऱ्या बजाज हिंदुस्तान शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बजाज शुगर कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 16.30 टक्क्यांच्या वाढीसह 16.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काल इंट्राडे ट्रेड सेशनमध्ये बजाज शुगर कंपनीच्या स्टॉकने 20 टक्के अप्पर सर्किट स्पर्श केला होता आणि शेअरमध्ये 16.20 रुपयांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. वास्तविक पाहता या पेनी स्टॉकमध्ये अचानक आलेली ही तेजी एका सकारात्मक बातमीमुळे दिसून आली आहे, असे तज्ञांनी म्हंटले आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये बजाज शुगर कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढले आहेत.

स्टॉक वाढीचे कारण :
बजाज हिंदुस्थान शुगर कंपनीने आपल्या कर्जदारांना सर्व कर्जाची परत फेड केली आहे. या कंपनीने मागील आठवड्यात सादर केलेल्या एका निवेदनातून माहिती दिली की,”बाजाज शुगर कंपनी आपल्या सर्व कर्जदारांना मुदत कर्जाचे थकीत हप्ते, मुदत कर्जाचे थकीत व्याज आणि वैकल्पिकरित्या परिवर्तनीय डिबेंचर, कूपन यांची संपूर्ण थकीत देय रक्कम परतफेड करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कर्ज खात्यात आता कोणतीही देय रक्कम शिल्लक नाही.

शेअरची किंमत आणि वाटचाल :
बजाज हिंदुस्थान शुगर कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या अपर सर्किटवर 13.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या आधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बजाज शुगर कंपनीचे शेअर 11 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 17 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 9 रुपयांच्या खाली आली होती , जी त्यांची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी आहे. तर 22 एप्रिल 2022 रोजी बजाज शुगर कंपनीच्या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती, जी 22.58 रुपये होती.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
बजाज हिंदुस्तान शुगर ही भारतातील साखर आणि इथेनॉलचे उपत्पदान करणारी एक अग्रणी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीकडे एकूण 14 साखर कारखाने असून त्यांची एकूण ऊस गाळप क्षमता 1,36,000 TCD म्हणजेच सहा डिस्टिलरीज आहेत. कंपनीची दररोज 800 किलोलिटर औद्योगिक अल्कोहोल तयार करू शकते, इतकी मोठी त्यांची उत्पादन क्षमता आहे. त्याच वेळी कंपनीची एकूण वीज निर्मिती क्षमता 449 मेगावॅट आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock magic Of Bajaj Hindustan Sugar Limited share price has increased after announcing company has become loan free on 06 December 2022.

हॅशटॅग्स

Penny Stock magic(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x