19 November 2024 10:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stock | हलक्यात नका घेऊ भाऊ! 49 रुपयाच्या पेनी शेअरने 1100 टक्के परतावा दिला, मग! स्टॉक खरेदी करणार का?

Penny Stock

Penny Stock | अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन या पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील अडीच वर्षांपूर्वी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 49 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन शेअर्स 600 रुपयांवर पोहोचले आहेत. अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्सने मागील अडीच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1100 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी खूप मोठी गुंतवणूक केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 621.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

3 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/ BSE वर अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 48.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 621.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 12.82 लाख रुपये झाले असते.

अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 64 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने फक्त एका वर्षात लोकांना 64 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कंपनीचे शेअर्स 18 नोव्हेंबर 2021 रोजी 377.35 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 18 नोव्हेंबर 2022 रोजी हे शेअर्स 621.25 रुपयेवर व्यवहार करत होते. या वर्षी आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 54 टक्के नफा कमावून दिला आहे. अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 745.70 रुपये आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 354.50 रुपये होती.

आशिष कचोलिया यांची गुंतवणूक :
आशिष कचोलिया यांनी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे 3.72 लाख शेअर्स होल्ड केले आहेत. आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे 372128 शेअर्स सामील आहेत. हा वाटा एकूण पेड अप कॅपिटलच्या 2.49 टक्के आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीने 7.18 कोटी रुपये निव्वळ नफा संकलित केला होता, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 178 टक्के अधिक आहे. मागील वर्षी याच कालावधीत नफ्याचे प्रमाण 2.59 कोटी रुपये होते. 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा 163.44 कोटी रुपये एकूण महसूल कमावला होता. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 121.8 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Agarwal Industrial corporation limited Share price return on investment on 19 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x