22 January 2025 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Penny Stock | बाब्बो! या 4 रुपयाच्या पेनी शेअरची जादू, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक खरेदी करावा?

Penny Stock

Penny Stock | मॅगेलॅनिक क्लाउड लिमिटेड या IT सेवा व्यवस्थापन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर रिटर्न्स दिले आहेत. शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 429.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 8 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. कमाईच्या बाबतीत या स्मॉल कॅप कंपनीने मोठ्या कंपन्यांनाही पछाडले आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत 10,000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 पट अधिक वाढले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Magellanic Cloud Share Price | Magellanic Cloud Stock Price | BSE 538891)

8 वर्षांत शेअर्सची किमत 100 पट वाढली :
22 जानेवारी 2015 रोजी मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्यात आले होते. ज्या वेळी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला, त्याची किंमत फक्त 4 रुपये होती. आता या कंपनीचे शेअर्स 430 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे, मागील आठ वर्षांच्या कालावधीत या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 10,648.75 टक्के नेत्रदीपक परतावा कमवून दिला आहे.

1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये :
जर तुम्ही 22 जानेवारी 2015 रोजी मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपये पेक्षा अधिक झाले असते.

एका वर्षात 760.76 टक्के परतावा :
मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2022 या चालू वर्षात छप्परफाड परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला ज्यां लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना आतपर्यंत 760.76 टक्के परतावा मिळाला आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 8.60 लाख रुपये झाले असते.

अल्पावधीत गुंतवणूकदार श्रीमंत :
मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत लोकाचे पैसे गुणाकार केले आहेत. 2022 या चालू वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 760.76 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत, जे इतर कोणत्याही गुंतवणूक योजनेपेक्षा खूप जास्त आहेत. जर तुम्ही 2022 या वर्षाच्या सुरुवातीला मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुम्हाला 8.60 लाख रुपये परतावा मिळाला असता.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
मॅगेलॅनिक क्लाउड कंपनी मुख्यतः डिजिटल क्षेत्रात उद्योग करणारी कंपनी आहे. ही कंपनी आयटी सेवा व्यवस्थापन करते. कंपनी आपल्या ग्राहकांना मोबाइल आणि डेस्कटॉपसाठी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स सेवा प्रदान करते. तसेच या कंपनीने क्लाउड, आयटी सेवा, सुरक्षा आणि ड्रोनसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीने आपली व्यापारी क्षमता वाढवण्यासाठी आणि उत्तम सेवा देण्यासाठी अनेक स्पर्धक आणि सेवा पूरक कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
2022 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत Magellanic Cloud कंपनीने 28.66 कोटी रुपये नफा कमावला होता. आणि मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 20.47 टक्क्यांनी वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 23.79 कोटी रुपये होता. तर या कालावधीत कंपनीचे एकूण सेल्स प्रमाण 66.59 टक्क्यांच्या वाढीसह 90.54 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील आर्थिक वर्षाच्या याच महिन्यात कंपनीचे एकूण सेल्स प्रमाण 54.35 कोटी रुपये होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Magellanic Cloud share price has increased and given huge returns in short term on 12 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x