22 November 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Penny Stocks | दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी या पेनी स्टॉकमधून एक्सिट घेतला, तुमच्या कडे आहे का हा स्टॉक?

dolly khanna, portfolio, stock market, sold stocks,

Penny Stocks | डॉली खन्ना या दिग्गज गुंतवणूकदारने बऱ्यचा पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती आणि मागील वर्षात त्यांनी बराच चांगला परतावा मिळवून दिला आहे, त्यापैकी डॉली खन्नाने आतापर्यंत ४७% परतावा दिलेल्या कंपनीतील आपला हिस्सा विकला आहे. शेअर बाजारात नोंदणीकृत काही निवडक कंपन्यांनी जून २०२२ तिमाहीसाठी त्यांचा शेअरहोल्डिंग पॅटर्न घोषित केला आहे. आघाडीच्या टॉपगुंतवणूक गुरूंचा समावेश असलेली शेअर खरेदीची बातमी अनेकदा पेनी शेअरचे आकर्षण वाढवते. आणि गुंतवणूकदार त्यात पैसे टाकतात.

स्टॉक निवडण्याच्या प्रक्रियेचे अनुकरण :
भारतातील शेअर मार्केट मधील दिग्गज आणि सर्वात मोठे गुंतवणूक करणारे म्हणजे राकेश झुनझुनवाला, डॉली खन्ना, आशिष कचोलिया आणि सारख्यां दिग्गज लोकांचा विचार केला तर आपल्याला यांच्यात एक साम्य दिसेल की या गुंतवणूकदारांकडे त्यांच्या गुंतवणुकीच्या कारकीर्दीत परतावा निर्माण करण्याचा जबरदस्त ट्रॅक रेकॉर्ड आहे. किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा त्यांच्या स्टॉक निवडण्याच्या प्रक्रियेचे अनुकरण करताना दिसतात आणि सर्वोत्तम मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असतात जे आपल्याला जास्तीत जास्त परतावा मिळवून देतील. त्यामुळे, या मोठ्या गुंतवणूकदारांनी कोणते स्टॉक्स खरेदी केले किंवा विकले या सर्व बातमी आणि टिप्स वर लोकांचे लक्ष लागलेले असते.

शेअर होल्डिंग पॅटर्न जाहीर करावा लागतो :
एक ठराविक प्रक्रियेनुसार नोंदणीकृत कंपन्याना आपला शेअर होल्डिंग पॅटर्न जाहीर करावा लागतो. त्याला अनुसरून काही निवडक कंपन्यांनी जून २०२२ च्या तिमाहीसाठी त्यांचे शेअरहोल्डिंग पॅटर्न घोषित केले आहे. त्यामुळे या दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये फेरबदल झाल्याचे दिसते आणि पोर्टफोलिओ मध्ये बदल झाल्याचे दिसते. एक प्प्रसिद्ध गुंतवणूकदार ज्याच्या पोर्टफोलिओ चा आम्ही अभ्यास केला ती म्हणजे डॉली खन्ना.

खेतान केमिकल्स स्टॉक :
२०२२ च्या पहिल्या तिमाहीत, डॉली खन्ना यांनी काही स्टॉकमध्ये एक्सपोजर वाढवले तर तिने काही स्टॉक्समधूनही बाहेर पडण्याचा निर्णय देखील घेतला. त्यापैकी खत व्यापार क्षेत्रातून एक पेनी स्टॉक होता ज्यातून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तो म्हणजे खेतान केमिकल्स. नुकताच जाहीर झालेल्या खेतान केमिकल्सच्या नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्नवरून असे दिसून येते की डॉली खन्ना यांनी गेल्या तिमाहीत आपला बराच मोठा हिस्सा विकून बाहेर पडली आहे. खेतान केमिकल्स आणि फर्टिलायझर्स ९५₹ च्या सध्याच्या बाजारभावाने ट्रेड करत आहे.

मूळच्या चेन्नईच्या गुंतवणूकदार :
डॉली खन्ना या मूळच्या चेन्नईच्या गुंतवणूकदार आहे, त्या आपल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. डॉली खन्ना या प्रसिद्ध मिडकॅप्स आणि स्मॉलकॅप्स स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखली जाते. डॉली १९९६ पासून स्टॉकमध्ये गुंतवणूक करत आहे. डॉली खन्ना यांचा पोर्टफोलिओ चे व्यवस्थापन त्यांचे पती राजीव खन्ना करतात, त्यांचे लक्ष सहसा उत्पादन, कापड, रसायन आणि साखर शेअर्सयातील अधिक पारंपारिक स्टॉक्सकडे जास्त आहे.

डॉली खन्ना खेतान केमिकल्स आणि फर्टिलायझर्समधील हिस्सा विकून का बाहेर :
मार्च २०२२ च्या तिमाहीत, डॉली खन्ना यांची खेतान कंपनीत १% भागीदारी होती, त्यात त्यांची ९८९,५९१ शेअर्स ची होल्डिंग होती. नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्न जाहीर झाल्यावर डॉली खन्ना नाव गहाळ असल्याचे दिसून आले याचा अर्थ भारतीय शेअर बाजार घसरत असताना तिने स्टॉकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही की डॉली खन्नाने तिचे संपूर्ण होल्डिंग विकले आहेत की आंशिक भागभांडवल विकले. NSE BSE वर नोंदणीकृत कंपन्यांना १% किंवा त्याहून अधिक शेअर्स असलेल्या भागधारकांची नावे जाहीर करणे बंधनकारक आहे.

डॉली खन्नाने तिची हिस्सेदारी विकण्याचे कारण काय :
डॉली खन्नाने जानेवारी-मार्च २०२२ तिमाहीत खेतान केमिकल्स कंपनीचे शेअर विकत घेऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले होते, आणि या स्टॉकने डॉलीला ४७% परतावा मिळवून दिला. बाजारात अस्थिरता असताना देखील अशा वेळी जेव्हा मूलभूतपणे मजबूत स्टॉक्स देखील घसरले होते, तेव्हा या स्टॉकने जवळपास ४७% नफा दिला आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की डॉली खन्ना यांनी स्टॉक विकून नफा बुक केला असावा. यूएसए ने नुकताच रेड-हॉट चलनवाढीचा अहवाल दिल्याने जागतिक बाजारात आणि स्टोक्स मध्ये चिंता वाढत आहे त्यामुळे कदाचित अस्थिर बाजारापासून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला असावा.

जागतिक पातळीवर होणाऱ्या गॅस आणि कच्या तेलाच्या किंमतीतील बदलाचा परिणाम इतर सर्व गोष्टींच्या किंमतीवर होतो आणि महागाई वाढते. तसेच ऊर्जा आणि रासायनिक उद्योगासाठी, जीवाश्म इंधन हे केवळ ऊर्जेचा स्रोत नसून उत्पादनासाठी कच्च्या मालाचा फीडस्टॉक देखील आहे. याचा अर्थ रासायनिक उत्पादन उद्योगावर गॅस आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे सर्वाधिक परिणाम पडला आहे. जागतिकऊर्जा संकटाचा परिणाम रासायनिक क्षेत्रातील सर्व कच्च्या मालावर आणि त्याच्या उत्पादनावर झाला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढू लागली आहे जी मागील २ तिमाहीत सर्वात जास्त दिसून येत आहे. यामुळे अल्पावधीत रासायनिक आणि खत उद्योगाची उत्पादन क्षमता कमी होऊ शकते.

खेतान केमिकल्स आणि फर्टिलायझर्स ची कामगिरी :
वार्षिक दर वाढ या आधारावर खेतान केमिकल्सचे शेअर्स ४८% वाढले आहेत. अलीकडच्या काळात, ह्या स्टॉक ला बऱ्याच दबावाला सामोरे जावे लागले होते. आणि गेल्या पंधरवड्यात हा स्टॉक १०% खाली आला आहे. खेतान केमिकल्सने या वर्षी १८ एप्रिल रोजी १५७ ₹ चा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता तर गेल्या वर्षी २४ ऑगस्ट २०२१ रोजी ₹ ५१.५ हा ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला होता. सध्याच्या ट्रेडिंग किमतीवर, कंपनी ११.५ च्या PE मल्टिपलवर व्यापार करत आहे. त्याची किंमत ते बुक व्यालु ३.७ पट जास्त आहे.

खेतान केमिकल्स बद्दल जाणून घेऊ:
मूलतः खतांचा व्यापार करणारी ही कंपनी सिंगल सुपर फॉस्फेट खतांचे उत्पादन, सल्फ्यूरिक ऍसिड आणि त्याचे प्रकार, तेल बियाणे प्रक्रिया आणि पवन ऊर्जा ह्या व्यापारात खेतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स एक अग्रणी कंपनी मानली गेली आहे. कंपनीची भारतातील सर्वात मोठी सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) उत्पादन क्षमता मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांमध्ये स्थित आहे. सल्फ्यूरिक ऍसिड (SA) उत्पादन क्षमता २७०,६०० मेट्रिक टन आहे. कंपनीने रतलाममध्ये एक मोठी सोयाबीन खाद्यतेल रिफायनरीची स्थापना केली असून मोठ्या प्रमाणात सोयाबीन क्रशिंग क्षमता देखील मिळवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

news title: Penny Stocks from Dolly khanna portfolio on 18 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x