Penny Stocks | होय खरंच! या सर्व पेनी शेअर्सची किंमत 11 रुपयांपेक्षा कमी, परतावा कोटीत, गुंतवणूकदारांच्या नजरेतील स्टॉक लिस्ट
Penny Stocks | 11 रुपये पेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या या 5 शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमवू दिला आहे. यात जेएमडी व्हेंचर्स लिमिटेड, अॅडकॉन कॅपिटल, इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड, बीएलएस इन्फोटेक लिमिटेड आणि जेनिथ स्टील पाईप्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा समावेश आहे. पेनी स्टॉक खूप स्वस्त किमतीवर ट्रेड करत असतात कारण त्यांचे बाजार भांडवल अल्प असते. म्हणूनच पेनी स्टॉकमध्ये पैसे लावणे, जोखमीचे असते. पण पेनी स्टॉकबाबत खास गोष्ट अशी की, ते एकदा वाढू लागले तर जबरदस्त परतावा कमावून देतात. आज या लेखात आपण अशाच पाच पेनी स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. (Penny stocks are stocks of small publicly-traded companies listed on stock exchanges for a price lower than INR 10)
जेएमडी व्हेंचर्स लिमिटेड :
मागील एक वर्षात या शून्य-डेट पेनी स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 471.21 टक्के नफा मिळवून दिला आहे. 8 मार्च 2022 रोजी शेअर बाजारात आल्यापासून या शेअरची किंमत 416.44 टक्क्यांनी वधारली आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून डायव्हर्सिफिक सेक्टर्समध्ये व्यापार करते. या कंपनीची स्थापना 2000 साली झाली होती. या स्मॉल कॅप कंपनीचे मार्केट कॅप 32.64 कोटी रुपये आहे. स्टॉक 3 जानेवारी 2023 रोजी 11.09 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
BLS इन्फोटेक लिमिटेड :
या शून्य-कर्ज असलेल्या कंपनीच्या शेअरनी मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 362.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या शेअरने लोकांची गुंतवणूक 771.43 टक्के वाढवली आहे. अवघ्या 3 वर्षात या स्टॉकची किंमत 1420 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीचा मार्केट कॅप 133.50 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यापार करते. 3 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 3.13 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
Integra Essentia Limited :
3 जानेवारी 2023 रोजी Integra Essentia Ltd कंपनीचचे शेअर्स 6.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या स्टॉकने मागील 1 वर्षात आपल्या शेअर धारकांना 371.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 3 वर्षात या स्टॉकची किंमत 1241 टक्के वाढली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 310.78 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः टेक्सटाईल क्षेत्रात व्यापार करते. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 651.65 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Adcon Capital Services Limited : Adcon Capital Services Limited कंपनीचे शेअर्स आज 2.98 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचा मार्केट कॅप 20.62 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 398.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 31 जुलै 2022 पासून या स्टॉकने लोकांना 381.36 टक्के नफा मिळवून दिला आहे. ही कंपनी मुख्यतः वित्तीय सेवा क्षेत्रात व्यापार करते. मागील 6 महिन्यांत या शेअरची किंमत 300 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात या शेअरची किंमत 129.03 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
Zenith Steel Pipes & Industries Ltd :
या कंपनीच्या शेअरची किंमत 3 जानेवारी 2023 रोजी 5.60 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 262.34 टक्के परतावा कमावन दिला आहे. मागील 5 वर्षात या शेअरची किंमत 952.83 टक्के वाढली आहे. ते या कंपनीचे मार्केट कॅप 76.12 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्याहा धातू आणि लोह पोलाद क्षेत्रात व्यापार करते.
पेनी स्टॉकमध्ये जोखीम जास्त :
गुंतवणूक करताना जोखीम जितकी जास्त असते, तितका जास्त परतावा ही मिळतो. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतवा मिळतो मात्र त्यात पैसे बुडण्याचा धोकाही जास्त असतो. पण असे शेअर्स फार कमी आहेत. 10 पैकी 1 पेनी स्टॉक तुमचे नशीब बदलू शकतो. पेनी स्टॉक कंपन्यांच्या कमी मार्केट कॅपमुळे, कोणताही मोठा ट्रेडर या पेनी स्टॉकच्या किमतीत मोठा फेरफार करु शकतो. 1-2 कोटींच्या गुंतवणुकीसह हे पेनी स्टॉक शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून रातोरात त्याची किंमत बदलता येते. सर्वात जास्त जोखमीची गोष्ट म्हणजे अशा पेनी स्टॉकमध्ये तरलता खूपच कमी असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks list below 11 rupees check details on 03 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल