22 January 2025 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
x

Penny Stocks | या 15 रुपयाच्या शेअरने पैशाचा पाऊस पाडला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 91 लाख परतावा, स्टॉकचं नाव नोट करा

Penny Stocks

Penny Stocks| इलेक्ट्रॉनिक स्पेशॅलिटी रिटेल उद्योगाशी संबंधित आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ‘सुपर से ऊपर’ असा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. आदित्य व्हिजन रिटेल लिमिटेड ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स सहा वर्षांपूर्वी 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 1400 रुपयांपर्यंत गेले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आदित्य व्हिजनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1528.70 रुपये आहे. त्याच वेळी, शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 598.55 रुपये होती.

1 लाख रुपयांवर 91 लाखाचा परतावा :
आदित्य व्हिजन च्या स्टॉक ने गुंतवणूकदारांना एक लाख गुंतवणुकीवर 91 लाखांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअर्सनी मागील काही वर्षांत जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. 16 डिसेंबर 2016 रोजी आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 15.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक BSE निर्देशांकावर 1401.80 पातळीवर ट्रेड करत होता. आजपर्यंत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना 9050 टक्केचा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 16 डिसेंबर 2016 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 91.62 लाख रुपये झाले असते.

3 वर्षात एकूण रिटर्न्स :
9 ऑक्टोबर 2019 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 21 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करणारा स्टॉक, 22 सप्टेंबर 2022 रोजी 1401.80 रुपये वर पोहोचला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक संयमाने होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 66.75 लाख रुपये झाले असते. कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत 2700 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. त्याच वेळी, आदित्य व्हिजनच्या स्टॉकने 2022 या चालू वर्षात सुमारे 123 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

कंपनीबद्दल सविस्तर :
आदित्य व्हिजन लिमिटेड ही बिहार राज्यातील इलेक्ट्रॉनिक रिटेल क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 10,000 पेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचा समावेश होतो. मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅब्लेटपासून टीव्ही, साउंड बार, होम थिएटर, कॅमेरा, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनसारख्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची विक्री ही कंपनी करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Aditya vision retail limited share price return on investment on 22 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x