
Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये योग्य ज्ञान आणि माहिती असल्याशिवाय गुंतवणूक करणे फार जोखमीचे आहे. परंतु स्टॉकची निवड योग्य पद्धतीने केली तर तुम्ही गुंतवणूक करून अप्रतिम परतावा कमवू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे,”आदित्य व्हिजन”. बीएसई निर्देशांकावर सूचीबद्ध झालेल्या या स्टॉकने 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांचे पैसे दोन पट अधिक वाढवले आहेत. वर्ष-दर-वर्ष कालावधीत या स्टॉकची किंमत सुमारे 630 रुपये वरून 1390 रुपये पर्यंत गेली आहे.
आदित्य व्हिजन शेअरची कामगिरी :
पेनी स्टॉक आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरची किंमत 6 वर्षांपूर्वी दुहेरी अंकावर होती, ज्यात वाढ होऊन आता ती चार अंकांवर गेली आहे. कोविड लॉकडाऊन नंतरच्या रॅलीमध्ये या कंपनीच्या शेअरने जबरदस्त तेजी पकडली होती. मागील 3 वर्षांत BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध असलेला हा शेअर 20 रुपयेवरून 1390 रुपयेपर्यंत वाढला आहे. याकाळात ज्या लोकांनी हे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी 6900 टक्के परतावा कमावला आहे.
आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका महिन्यात 12 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. मागील सहा महिन्यांत या स्मॉल-कॅप कंपनीचे स्टॉक 780 रुपये किमतीवरून 1390 रुपयेवर गेले आहेत. या कालावधीत या स्टॉकची किंमत 75 टक्क्यांनी वाढली आहे. मागील काही वर्षात हा स्मॉल-कॅप स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक म्हणून नावारूपाला आला आहे. 2022 मध्ये, आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर 630 रुपयेवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन स्टॉक 1390 रुपयेवर पोहोचला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी स्टॉक खरेदी केले होते, त्यांनी 120 टक्के परतावा कमावला आहे.
परताव्याची गणान समजून घ्या :
आदित्य व्हिजन कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर, आपल्याला समजेल की या कंपनीने मागील काही वर्षात अप्रतिम कामगिरी केली आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 88,000 रुपये झाले असते. मागील सहा महिन्यांत जी तुम्ही हा स्टॉक खरेदी केला असता तर, तुमच्या एक लाखाचे आता 1.75 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला यात 1 लाख लावले असते, तर आता तुमचे एक लाख रुपये वाढून 2.20 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही एका वर्षापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.60 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात हा स्टॉक 60 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आता तुम्हाला 1 लाख आज 51 लाख रुपये परतावा मिळाला असता. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये मागील दोन वर्षांत 5,000 टक्क्यांची अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे, हा स्मॉल-कॅप कंपनीचा स्टॉक मागील तीन वर्षांत 20 रुपयेवरून 1390 रुपयेवर गेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























