22 January 2025 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

Penny Stocks | या 3 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 कोटीचा परतावा, तुम्ही सुद्धा हा स्टॉक लक्षात ठेवा

Penny Stocks

Penny Stocks| शेअर बाजारातील अस्थिरता आणि विक्रीचा दबाव असूनही काही शेअर्स असे आहेत जे प्रवाहाच्या विरुद्ध तेजीत वाढत आहेत, आणि आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण अश्याच एका शेअरबद्दल माहिती घेणार आहोत, जो कधीकाळी फक्त 3 रुपये वर ट्रेड करत होता, पण सध्या तो 1395 रुपयांच्या वर गेला आहे. असे अनेक शेअर मार्केट महदे ट्रेड करत आहेत, जे प्रवाहाच्या विरुद्ध तेजीत वर जात आहेत, आणि गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत.

मल्टीबॅगर शेअर :
शेअर बाजारात तेजी आणि मंदी येतच असते. हे एक चक्र आहे जे शेअर बाजाराला चालवत असते. यावेळी जागतिक शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहू शकतो. आता कुठे युद्ध आणि ह्या विक्रीच्या दबावातून शेअर बाजार सावरताना दिसत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर पुन्हा विश्वास दाखवून गुंतवणूक सुरू केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना आपण पाहू शकतो. पडझडीच्या काळात ही असे काही शेअर्स होते, ज्यांनी चांगली कामगिरी गेली आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये योग्य माहिती आणि ज्ञान घेऊन गुंतवणूक केली तर तुम्ही गुंतवणुकीतून खूप पैसे कमवू शकता.

कंपनी बद्दल सविस्तर: आपण या लेखात ज्या कंपनीची चर्चा करत आहोत, ती आहे अजिंटा फार्मा. ह्या फार्मा कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. अजिंटा फार्मा कंपनी औषध उत्पादन आणि वितरण व विपणन या उद्योगात सक्रीय आहे. या कंपनीचे शेअर्स 2.72 रुपये पासून ट्रेड व्हायला सुरुवात झाली होती, आता हा स्टॉक 1395 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मागील काही वर्षात पडझडीच्या या काळातही आजिंटा फार्माच्या शेअर्सने आपल्या भागधारकांच्या गुंतवणुकीत 50,000 टक्क्यांहून अधिक परताव्याची भर घातली आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1061.77 रुपये होती, आणि त्याची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1577.20 रुपयेच्या जवळ आहे.

1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 5 कोटींहून अधिक परतावा :
या स्टॉकने गेल्या काही वर्षांमध्ये इतकं कमालीचे प्रदर्शन केले आहे की भागधारकांच्या संपत्तीमध्ये कित्येक पटीची भर पडली आहे. 7 फेब्रुवारी 2003 रोजी अजिंटा फार्माचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) फक्त 2.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या 13 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक NSE वर 1395 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच सुरुवातीपासून आतापर्यंत या स्टॉकमधील भागधारकांना 50,000 टक्क्यांहून जास्त असा भरघोस परतावा मिळाला आहे. कंपनीने आतापर्यंत कमावलेल्या नफ्याचे निरीक्षण केले तर असे दिसेल की, जर आपण 7 फेब्रुवारी 2003 रोजी अजिंटा फार्माच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आतापर्यंत स्टॉक होल्ड केला असता तर, आज आपल्या गुंतवणुकीवर 5.12 कोटी रुपये पेक्षा अधिक परतावा मिळाला असता.

शेअरची आतापर्यंतची वाटचाल :
21 सप्टेंबर 2012 रोजी अजिंटा फार्माचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर म्हणजेच NSE निर्देशांकावर 75.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 सप्टेंबर 2022 रोजी NSE मध्ये शेअरची किंमत 1395 रुपये नोंदवण्यात आली होती. म्हणजेच, जर तुम्ही 10 वर्षांपूर्वीही ह्या फार्मा स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीवर 18.39 लाख रुपये पेक्षा अधिक परतावा मिळाला असता. मागील 1 महिन्यात कंपनीने अतिशय चांगली कामगिरी केली असून, स्टॉकमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिन्या भरापूर्वी 16 ऑगस्ट रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 1276 रुपये होती. म्हणजेच फक्त एका महिन्यात कंपनीच्या स्टॉकने इतके जोरदार प्रदर्शन केले की शेअर्सच्या किमतीत सुमारे 8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Ajanta Pharma share price return on 14 September 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(592)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x