14 January 2025 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Penny Stocks | या शेअरने 8000 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आता म्युचुअल फड कंपन्यांकडून स्टॉक खरेदी, तुम्हीही विचार करा

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात मागील आठवड्यापासून पुन्हा विक्रीचा दबाव दिसून येत आहे. शेअर बाजारात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या अस्थिर वातावरणात ही काही कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगलं परतावा मिळवून दिला आहे. आज आपण अश्याच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, त्याचे नाव आहे, “बेस्ट अॅग्रोलाइफ”.

8000 टक्क्यांचा भरघोस परतावा :
मागील 6 वर्षात बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 8000 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. पण यावेळी या काळात बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनी एका मोठ्या गुंतवणुकीमुळे चर्चेत आली होती. क्वांट म्युच्युअल फंडाने या बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनीचे 1.78 लाख शेअर्स घेतले आहेत. क्वांट म्युचुअल फंड कंपनीने 1.78 शेअर्सची खरेदी 21.76 कोटी रुपयांत केली आहे. क्वांट म्युचुअल फंडने ज्यावेळी ही खरेदी केली त्यावेळी शेअर्स ची किंमत 1222.60 रुपये होती.

सकारात्मक परिणाम :
क्वांट म्युचुअल फंडने बेस्ट अॅग्रोलाइफचे शेअर्स खरेदी करण्याची बातमी येताच कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत NSE निर्देशांकावर 1307.50 रुपये प्रती शेअर होती. मात्र, त्यानंतर लगेचच शेअरमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकींग झालेली दिसून आली, आणि शेअरची किंमत 1280 रुपयांपर्यंत पडली होती.

दिग्गज गुंतवणूकदाराचा समावेश :
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक प्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनीही बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनीचे 940.88 रुपये दराने 3.18 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. 30 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या गुंतवणुकीत आशिष कचोलिया यांनी 3.18 लाख शेअर्स 29.92 कोटी रुपयात खरेदी केले आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून आशिष कचोलिया यांनी आतापर्यंत 36 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावलं आहे.

आतापर्यंतचा एकूण परतावा :
29 एप्रिल 2016 रोजी बेस्ट अॅग्रोलाइफचा शेअर 15.75 रुपये प्रती शेअर किमतीवर ट्रेड करत होता. सध्या शेअर्सची किंमत 1307 रुपये प्रती शेअर किमतीवर गेली आहे. मागील 6 वर्षात या कंपनीने आपल्या भागधारकांना 8000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षभराबाबत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 70 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. चालू वर्ष 2022 मध्ये, कंपनीच्या स्टॉकने आतापर्यंत 25 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Best AgroLife Share Price return on 22 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x