22 December 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
x

Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा

Penny stocks

Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणे थोडीफार जोखमीचे असतेच, पण ज्ञान नसताना गुंतवणूक करणे अतिशय धोकादायक असते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी त्या कंपनी बद्दल सखोल माहिती असावी मगच आपले पैसे त्यात गुंतवावे. स्मॉल कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक करणे थोडे धोकादायक असते, कारण बाजारातील अस्थिरतेचा सर्वात जास्त विपरीत परिणाम छोट्या स्टॉकवर होतो. पैसे बुडण्याचा सर्वात जास्त धोका लहान कंपन्यांमध्ये असतो, तर मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांमध्ये पैसे बुडण्याची शक्यता खूप कमी असते. जरी मोठ्या कंपनीचे शेअर्स आता पडले असतील तर पुढील येणाऱ्या काळात ते चांगले वाढू शकतात, याचा गुंतवणूकदारांना विश्वास असतो.

कधीकधी छोट्या कंपन्या किंवा पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा कमावून देतात आणि मल्टीबॅगर्स कंपनीच्या यादीत सामील होतात. अशीच एक स्मॉल कॅप कंपनी जिचे नाव “Flomik Global Logistics Limited” आहे, जिने आपल्या गुंतवणूकदारांना अपेक्षे पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ही कंपनी भारतातील आघाडीची गोदाम व्यवस्थापक करणारी कंपनी आहे. या कंपनीने फक्त साडेतीन वर्षात आपल्या भागधारकांचे पैसे हजारो पट वाढवले आहेत. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे एकूण बाजार भांडवल 106 कोटी रुपये आहे.

मल्टीबॅगर परतावा :
या स्मॉल कॅप कंपनीने तर परताव्याच्या बाबतीत दिग्गज आणि मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकेल आहे. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहे. या कंपनीने 28 मार्च 2019 रोजी BSE/बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकात फक्त 0.35 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेडिंग सुरू केली होती. मागील 2 वर्षे हा शेअर पेनी स्टॉक म्हणून ट्रेड करत होता, परंतु त्यानंतर, शेअर्स इतक्या प्रचंड तेजीत आले की त्यानं परताव्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी हा स्टॉक 147.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

Flomik Global Logistics कंपनीचे शेअर्स साडेतीन वर्षांपूर्वी बाजारात दाखल झाले होते. त्यावेळी या स्टॉकची किंमत फक्त 0.35 पैसे होती. आज हा स्टॉक 147 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अशाप्रकारे, मागील साडेतीन वर्षात या शेअर्सची किंमत 41,971.43 टक्क्यांनी वधारली आहे. जर तुम्ही 28 मार्च 2019 रोजी फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 4.20 कोटी रुपये झाले असते. त्याच वेळी जर तुम्ही या शेअरमध्ये फक्त 25 हजार रुपये लावले असते, तर आज तुम्हाला 25 हजार रुपये वर 1 कोटी 5 लाख रुपये परतावा मिळाला असता. अशाप्रकारे, छोटी गुंतवणूक करून तुम्ही आज करोडपती झाला असता.

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सचे चार्ट पॅटर्नचे निरीक्षण केल्यास आपल्यास समजेल की मागील 1 महिन्यात शेअर्स ची किंमत 5 टक्क्यांनी वर गेली आहे. मागील 1 वर्षा या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना 35.28 टक्के नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी किंमत 216.30 रुपये आहे. सध्या हा शेअर आपल्या उच्चांकी किंमत पातळीच्या 32 टक्के खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stocks of Flomik Global Logistics share price return on investment 06 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x