19 November 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS
x

Penny Stocks | पैशाचा पाऊस! 8-10 रुपयांच्या 2 पेनी शेअर्समधून मोठा परतावा आणि फ्री बोनस शेअर्स, स्टॉक नेम नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात ट्रेड करणारे दोन पेनी स्टॉक गुंतवणूक तज्ज्ञांच्या नजरेत पडले आहेत, ज्यांनी लोकांना प्रचंड मोठा परतावा मिळवून दिला आहे. या दोन कंपन्याचे नाव आहे, Janus Corp आणि नवोदय एंटरप्रायझेस. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदाराना मजबूत परतावा कमावून दिला असून आता कंपनीने विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. नवोदय एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 प्रमाणे आणि Janus कॉर्पोरेशन कंपनीने 3:4 प्रमाणे बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

Janus Corp लिमिटेड :
या कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक ला सादर केलेल्या फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, ” Janus Copr लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ही कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक तीन शेअर्सवर 4 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करेल”. 30 नोव्हेंबर 2022 या ठरलेल्या रेकॉर्ड तारखेला पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात बोनस शेअर्स जमा केले जातील . Janus Corporation Ltd कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच्या मागील ट्रेडिंग सेशनमध्ये हे शेअर्स 8.59 रुपये किमतीवर 4.89 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. YTD आधारावर, 2022 मध्ये या कंपनीच्या स्टॉकमध्ये 68.77 टक्के घसरण झाली आहे.

नवोदय एंटरप्राइजेस :
या कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, “नवोदय एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कंपनी 1 विद्यमान शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख 29 नोव्हेंबर 2022 निश्चित केली आहे. ” नवोदय एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. या कंपनीचे शेअर सध्या 9.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 10.50 रुपयेवर गेली होती. YTD आधारावर 2022 मध्ये या स्टॉकची किंमत आतापर्यंत 4.40 टक्के घसरली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Janus Corporation and Navodaya Enterprises share price return on investment on 21 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x