Penny Stocks | या 3 रुपये 40 पैशाच्या पेनी शेअरने करोडपती केले, 32 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटीची परतावा, स्टॉक नेम?

Penny Stocks | 13 ऑक्टोबर 2022 रोजी, भारतीय शेअर बाजार निर्देशांक अस्थिरता असताना नकारात्मक घसरण सह) बंद झाला होता. सेन्सेक्स मध्ये 390.58 अंकांनची म्हणजेच 0.68 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आणि सेन्सेक्स घसरून 57,235.33 क्लोज झाला होता. निफ्टीमध्ये 109.30 अंकांची म्हणजेच 0.64 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आणि Nifty घसरणीसह 17,014.30 अंकावर क्लोज झाला होता. भारतीय शेअर बाजारात सुमारे 1283 हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते, तर 2054 शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. 130 शेअर्स मध्ये कोणताही बदल नव्हता.
विप्रो, अदानी पोर्ट्स, एसबीआय, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि एल अँड टी हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक पडलेल्या किमतीवर ट्रेड करत होते. तर एचसीएल टेक, सन फार्मा, कोल इंडिया, ब्रिटानिया आणि टाटा मोटर्स हे शेअर्स हिरव्या निशाणीवर तेजीत धावत होते. धातू आणि आरोग्य सेवा वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात नकारात्मक ट्रेड करत होते. तर बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांकमध्ये 0.5 टक्के ची पडझड पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुक करणे हा फायदेशीर पर्याय असतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकची माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे काही हजार रुपये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढवले.
करोडपती बनवणारा स्टॉक :
आज आपण या लेखात कजारिया सिरॅमिक्स स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. हा स्टॉक मागील 23 वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देत आहे. 1 जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर हा शेअर 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आज हा स्टॉक 1099 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये जवळपास 32,223.53 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. या शेअर मध्ये पैसे लावलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे 322 पट अधिक वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना केवळ 32000 रुपये गुंतवून 1.03 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
10 वर्षाचा परतावा :
कजारिया सिरॅमिक्स कंपनीच्या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्याला शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. 12 ऑक्टोबर 2012 रोजी हा स्टॉक NSE निर्देशांकावर 102.75 रुपयेवर ट्रेड करत होता, तर आज या स्टॉक ची किंमत 1099 रुपयेवर पोहोचली आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये 969.59 टक्केची मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. म्हणजेच या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 10 पटीने अधिक वाढवले आहेत. यासह गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 10.69 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
5 वर्षाचा परतावा : कजारीया कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा कमावून दिला आहे. 16 ऑक्टोबर 2020 रोजी NSE निर्देशांकावर हा स्टॉक 533.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तर सध्या या शेअरची कोमट 1099 रुपये आहे. या कालावधीत स्टॉक मध्ये जवळपास 106.13 टक्केची वाढ दिसून आली होती. म्हणजेच, फक्त पाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 2 पटीहून अधिक वाढवले आहे. पाच वर्षांपूर्वी ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांना आता 2.06 लाख रुपये परतावा मिळाला असणार.
1 वर्षाचा परतावा :
गेल्या एक वर्षात ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना नुकसान झाले आहे. हा स्टॉक गेल्या वर्षभरात जबरदस्त घसरला आहे. या कंपनीने मागील एक वर्षात नकारात्मक 15.70 टक्के घट नोंदवली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक 16.44 टक्क्यांनी पडला होता, तर मागील सहा महिन्यांत स्टॉकमध्ये 6.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एक महिन्याचा स्टॉकचा परतावा नकारात्मक 6.71 टक्के नोंदवला गेला होता.
कंपनी बद्दल थोडक्यात :
20 डिसेंबर 1985 रोजी कजारिया सिरॅमिक्स कंपनीची स्थापना कानपूर शहरात झाली होती. ही कंपनी चकचकीत आणि नॉन-ग्लाझ्ड भिंत आणि मजल्यावरील फरशा तयार करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. या कंपनीला 20 जानेवारी 1986 रोजी व्यवसाय करण्याचा परवाना मिळाला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Kajaria ceramics share price return on investment on 15 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
SJVN Share Price | सरकारी कंपनी एसजेव्हीएन शेअरने 347 टक्के परतवा दिला, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: SJVN