Penny Stocks | या शेअरने आधी 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 2.05 कोटी रुपये परतावा दिला, आता 1000 टक्के डिव्हीडंड, हा स्टॉक माहिती आहे?
Penny Stocks | वाहन उद्योगात लोकप्रिय असलेली मिड-कॅप कंपनी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ही शेअर बाजारात सूचीबद्ध असलेली एक माध्यम आकाराचे बाजार भांडवल असलेली कंपनी आहे. ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे.
प्रत्येक शेअरवर 100 रुपये लाभांश :
वाहन उद्योगात कार्यरत असलेली मध्यम भांडवल कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश रूपाने भेट देणार आहे. महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड कंपनीची मागील काळातील कामगिरी चांगली राहिली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना कमावलेल्या नफ्यातील काही भाग लाभांश म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी कोणतेही कर्ज नाही. कंपनीने SEBI नियामक फाइलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, 31 मार्च 2013 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवर 1000 टक्के अंतरिम लाभांश वितरीत केला जाईल. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 रुपये लाभांश मिळणार आहे. 10 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांच्या खात्यात अंतरिम लाभांश जमा करेल.
गुंतवणुकीचे मूल्य 2.05 कोटी रुपये झाले :
महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडचे शेअर्स सुरुवातीच्या काळात फक्त 25 रुपये किमतीची ट्रेड करत होते. सध्या एका शेअरची किंमत 5000 रुपये पर्यंत गेली आहे. महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडच्या शेअर्सने मागील काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. 6 नोव्हेंबर 2001 रोजी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 25 रुपयांच्या किमत पातळीवर ट्रेड करत होते. 16 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र स्कूटर्सचे शेअर्स BSE निर्देशांकावर 5140 रुपयांच्या किमतीवर जाऊन पोहोचले. 6 नोव्हेंबर 2001 रोजी जर आपण या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, आणि त्याची आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.05 कोटी रुपये झाले असते.
1 लाख गुंतवणुकीवर 15 लाखांचा परतावा : महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडच्या शेअरनी एक लाख गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना 15 लाखांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअर्सनी मागील 10 वर्षांत उत्तम कामगिरी करून व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. 14 सप्टेंबर 2012 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 337.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडचे शेअर्स BSE वर 5140 रुपयेच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. जर 10 वर्षांपूर्वी तुम्ही ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15.24 लाख रुपये झाले असते. महाराष्ट्र स्कूटर्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5309.05 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 3319.15 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Maharashtra Scooter limited share price return on 17 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे