21 January 2025 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Penny Stocks | हा पेनी स्टॉक 56 टक्क्याने स्वस्त झाला आहे, फ्री बोनस शेअर्सही मिळणार, हा शेअर खरेदी करावा का?

Penny Stock

Penny Stocks | रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि आर्थिक मंदीमुळे या वर्षी जगातील सर्व देशातील शेअर बाजारात बरीच अस्थिरता आणि गोंधळ दिसून येत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. ओझोन वर्ल्ड लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पण गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की, शेअर पडझडीमुळे स्वस्त झाल्यानंतर कंपनीने बोनस शेअर्स वितरण करण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या बोनस वाटप करणाऱ्या स्टॉकची पूर्ण माहिती.

ओझोन वर्ल्ड लिमिटेड या कंपनीने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली. या बैठकीत संचालक मंडळाच्या सदस्यांनी विद्यमान शेअर धारकांना 25,89,380 बोनस शेअर्स वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोनस शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, बोनस शेअर्स कोणत्या प्रमाणात दिले जातील, हे कंपनीने अद्याप जाहीर केले नाही. बोनस शेअर्स ची रेकॉर्ड डेट कंपनीकडून अजून जाहीर झाली नाही आहे.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओझोन कंपनीचा शेअर 2.12 टक्के पडला आणि 8.48 रुपयेवर ट्रेड करत होता. शेअर्सचे मागील 5 वर्षांचा चार्ट पॅटर्न पाहिले तर स्टॉकच्या किमतीत 73.14 टक्क्यांची घसरण झालेली दिसून येईल. त्याच वेळी, एक वर्षभरापूर्वी जर तुम्ही या स्टॉक मध्ये पैसे लावले असते तर, तुम्हाला 13.70 टक्के परतावा मिळाला असता. 2022 हे वर्ष शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी निराशाजनक ठरले आहे. या कंपनीच्या शेअरची किमत 44.56 टक्के कमजोर झाली आहे. BSE निर्देशांकावर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 18.99 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.52 रुपये होती. शेअर बाजारात हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 29 टक्के पडला आहे. ओझोन वर्ल्ड लिमिटेड कंपनीचे ​​आजार भांडवल 3.07 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Ozone World limited share price return on investment on 31 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x