18 November 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Penny Stocks | या 15 पैशांच्या पेनी स्टॉकने अनेकांना करोडपती केलं, आजही मिळतोय इतका स्वस्त, हा शेअर लक्षात ठेवा

Penny stock

Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणारा प्रत्येक व्यक्ती हा नफा कमावेल ह्याची शाश्वती नाही पण मूलभूत संशोधन करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणारी व्यक्ती हमखास परतावा कमावेल, याची गॅरंटी आहे. शेअर बाजारात कोणता स्टॉक तेजीत येईल आणि कोणता स्टॉक पडेल ह्याचा अंदाज लावणे सर्वांना जमत नाही. त्यातही स्मॉल कॅप कंपनीच्या पेनी स्टॉकच्या बाबतीत तर खूप जोखीम असते. असाच एक पेनी स्टॉक आहे, राज रेयॉन. या स्टॉकने मागील 3 वर्षात आपल्या भागधारकांना 26900 टक्के इतका कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. इतका भरघोस परतावा मिळवणारे गुंतवणूकदार नक्कीच लखपती काय तर करोडपतीही झाले असतील. या स्टॉक मध्ये 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवणूक केलेल्या व्यक्तीला 2 कोटीं पेक्षा अधिक परतावा मिळाला असणार.

राज रेयॉन इंडस्ट्रीज शेअर्सची वाटचाल :
राज रेयॉन कंपनीचा स्टॉक 1.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी किमतीवर ट्रेड करत होता, तो सध्या 13.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या भागधारकांना 5,300 टक्के इतका मल्टी-बॅगर परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे, जर आपण या कंपनीच्या मागील तीन वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली तर या पेनी स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा दिला आहे.

राज रेयॉन कंपनीच्या चार्टचे निरीक्षण केल्यास आपल्याला दिसेल की, मागील 3 वर्षात या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 26900 टक्के परतावा कमावला असणार. या शेअरमधील गुंतवणूकदार लखपती नाही तर करोडपती देखील झाले असतील. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये फक्त 1 लाख रुपयेची गुंतवणूक करून ती होल्ड करून ठेवली असती,तर सध्या तुम्हाला तुमच्या एक लाख गुंतवणुकीवर 2 कोटी 70 लाख रुपये इतका भरघोस परतावा मिळाला असता.

एकेकाळी स्टॉक 15 पैशांवर ट्रेड करत होता :
5 जानेवारी 2007 रोजी एनएसईवर राज रेयॉन कंपनीचे शेअर्स 5 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, 4 जानेवारी 2019 रोजी स्टॉक इतका पडला होता की त्याची किंमत फक्त 15 पैसे पर्यंत आली होती. 9 सप्टेंबर 2021 पर्यंत त्याची किंमत 25 पैशांपर्यंत गेली. या पडझडी नंतर, जेव्हा स्टॉक ने तेजी घेतली,त्यानंतर हा स्टॉक परत थांबला नाही. आता 15 पैशांवर ट्रेड करणारा हा स्टॉक सध्या 13.50 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stocks of Raj Rayon share price return on 14 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x