16 April 2025 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

Penny Stocks | गुंतवणूकदारांसाठी लाईफ चेंजर ठरला हा 2 रुपयाचा शेअर, 1 लाखावर तब्बल 7 कोटी परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger Stock , Relaxo Footwear

Penny Stocks| जगात सध्या आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आपण शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढल्याचे पाहू शकतो. परकीय गुंतवणूकदारांमध्ये रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जास्त भीती आहे, आणि त्यामुळे परकीय गुंतवणुकदार आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. रुपयाचे अवमूल्यन सातत्याने सुरू आहे, त्याचाही विपरीत परिणाम शेअर बाजारावर पडला आहे. अशा गोंधळाच्या काळातही शेअर बाजारात काही शेअर्स आहेत जे आपल्या भागधारकांना जोरदार परतावा कमावून देत आहे. अशा मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत फूट वीअर कंपनी रिलॅक्सोचा ही समावेश होती. Relaxo ही भारतातील सर्वात मोठी फूटवीअर उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
Relaxo कंपनीची स्थापना 1984 साली झाली होती. या कंपनीने स्थापनेपासून आतापर्यंत आपल्या भागधारकांना 3 वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनीया कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करून कोट्यवधीचा परतावा कमावला आहे. जर तुम्ही सुरुवातीच्या काळात या रिलॅक्सो फुटवेअरच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर तुमच्या एक लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून 7 कोटी रुपये झाले असते.

गुंतवणुकीवर एकूण परतावा :
Relaxo कंपनीच्या शेअर्सने गेल्या 23 वर्षात आपल्या भागधारकांना करोडपती केले आहे. 23 वर्षापूर्वी रेलॅक्सो कंपनीचा शेअर 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक आता 1,021 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 12 नोव्हेंबर 1999 रोजी Relaxo कंपनीचा शेअर 1.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या कंपनीचा शेअर 1,021.35 रुपये किमतीवर पोहोचला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर Relaxo Footwears Limited चे शेअर्स 1,021.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 23 वर्षाच्या दीर्घकाळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 69,855.48 टक्के नफा कमावून दिला आहे.

3 वर्षात Relaxo कंपनीच्या स्टॉक ने आपल्या भागधारकांना 108 टक्केचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नचे निरीक्षण केल्यास आपल्यास समजेल की या कंपनीने 294.53 टक्के जोरदार परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 15.19 टक्केची घसरण पाहायला मिळाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये वार्षिक दर वाढ आधारावर शेअर 22.76 टक्के खाली पडला आहे.

Relaxo कंपनीबद्दल थोडक्यात :
8 डिसेंबर 2000 रोजी Relaxo कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर वितरीत केले होते. त्यानंतर, कंपनीने पुन्हा एकदा 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते. या कंपनीने दुसरा बोनस 1 जुलै 2015 रोजी आणि तिसरा बोनस इश्यू 26 जून 2019 रोजी वितरीत केला होता.

कंपनीच्या व्यापराबद्दल थोडक्यात :
रिलॅक्सो फूटवेअर लिमिटेड ही भारतीय बहुराष्ट्रीय फूट विअर उत्पादन ब्रँड आहे. नवी दिल्ली स्थित ही कंपनी उत्पादन क्षमतेच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी पादत्राणे उत्पादन करणारी आणि कमाईच्या बाबतीत दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. Relaxo Footwears Limited ही कंपनी लार्ज-कॅप गटात सामील आहे. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 25,424.06 कोटी रुपये आहे. Relaxo कंपनीचे फ्लाइट, स्पार्क्स, बहामास आणि स्कूलमेट यासह इतर 10 ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Relaxo footwear limited share price return on investment on 07 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या