Penny Stocks | या 65 पैशांच्या शेअरने 5730 टक्के परतावा दिला, आजही हा स्टॉक स्वस्त, वेगाने पैसा देतोय हा स्वस्त शेअर
Penny Stocks | मागील काही महिन्यापासून गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जबरदस्त पडझडीला तोंड दिले आहे. शेअर बाजारचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा शेअर मार्केट मध्ये पडझड होते, त्या नंतर बाजार आणखी जास्त उसळी घेतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका मजबूत स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने फक्त 5 वर्षात आपल्या भागधारकांना करोडपती बनवले आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 5,730.77 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉकची चर्चा करत आहोत, तो आहे, “रितेश प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीज लिमिटेड”. हा स्टॉक मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या स्टॉक पैकी एक आहे.
रितेश प्रॉपर्टीज शेअरचा किंमत इतिहास :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये BSE निर्देशांकावर रितेश प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स 37.90 रुपयेच्या किंमत पातळीवर जाऊन बंद झाले होते. मागील 37.65 रुपये या क्लोजिंग प्राईसच्या तुलनेत शेअरची किंमत 0.66 टक्के वाढली आहे. 14 जुलै 1995 रोजी शेअर 1.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात कमालीची वाढ होऊन सध्या स्टॉक 37.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3,345.45 टक्के चा घसघशीत परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच 27 वर्षांपूर्वी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 34.45 लाख झाले असते.
मल्टीबॅगर परतावा :
तीन वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आता वाढून 25.43 लाख झाले आहेत, कारण या कालावधीत स्टॉकची किंमत 1.50 रुपयेवरून सर्वकालीन उच्चांक बाजारभावापर्यंत गेली आहे. या शेअरने मागील तीन वर्षांत 2443.62 टक्केचा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. पाच वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आता वाढून 58.30 लाख झाले आहेत, कारण 22 सप्टेंबर 2017 पर्यंत स्टॉक फक्त 0.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात कमालीची वाढ झाली असून आता तो सर्वकालीन उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच,मागील पाच वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 5,730.77 टक्केचा मजबूत परतावा कमावून दिला आहे.
उच्चांक आणि नीचांक किंमत :
मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने 142.33 टक्केचा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. ज्यामध्ये 146.67 टक्केचा CAGR देखील समाविष्ट आहे. वार्षिक दर वाढ आधारावर 2022 या वर्षात स्टॉकमध्ये आतापर्यंत 11.55 टक्केची घसरण झाली आहे. BSE निर्देशांकावर स्टॉक 55.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किंमत वर ट्रेड करत आहे. स्टॉकची 52-आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 14.86 रुपये होती. सध्या हा स्टॉक 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 50-दिवस आणि 100-दिवसांच्या EMA च्या नीचांक पातळीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसा अखेर स्टॉकमध्ये 200-दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर विक्रीचे संकेत दिसून आले आहेत.
प्रमोटर्स आणि परकीय गुंतवणूकदारांचा वाटा :
जून 2022 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत, कंपनीत प्रमोटर्सची शेअरहोल्डिंग 71.74 टक्के च्या जवळपास आहे. FII म्हणजेच परकीय गुंतवणूक संस्था त्यांचा वाचा 2.26 टक्के आहे. आणि सार्वजनिक शेअरहोल्डिंग चे प्रमाण 26.01 टक्के नोंदवले गेले आहे. प्रमोटर्स आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांचा गुंतवणूक वाटा जूनमध्ये सर्वाधिक होता, जो सप्टेंबर 2019 पासून स्थिर दराने वाढत आहे. म्हणजेच हा स्टॉक परकीय गुंतवणूकदार आणि परकीय गुंतवणूक संस्था यांच्या पसंतीचा स्टॉक आहे.
कंपनीबद्दल सविस्तर :
भारतातील रियल इस्टेट व्यवसाय हा सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारा व्यवसाय मानला जातो. रियल इस्टेट मध्ये उद्योग करणाऱ्या बऱ्याच कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध आहेत. त्यापैकीच एक रितेश प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ही रिअल इस्टेटच्या व्यवसायात कार्यरत असलेली एक स्मॉल-कॅप कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 926.39 कोटी रुपये आहे. मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात जो विक्रीचा दबाव वाढला होता, तो आता कमी होत असून रियल इस्टेट स्टॉक वाढू लागले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks Of Ritesh properties and industries share price on 19 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS