23 February 2025 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

Penny Stocks | सुख म्हणजे नक्की काय असतं?, ते या 2 रुपयाच्या पेनी शेअरच्या गुंतवणूकदारांना माहिती, 132533 टक्के परतावा दिला

Penny Stocks

Penny Stocks | जेव्हा तुम्ही शेअर बाजारात दीर्घकाळाचे दृष्टिकोन ठेऊन गुंतवणूक करता, तेव्हाच शेअर बाजार तुम्हाला भरघोस परतावा मिळवून देणार. शेअर बाजारात एक म्हण आहे, जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून 10 वर्षे संयम ठेवू नासाल, तर शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचारही करू नका. शेअर बाजारातील दिग्गज लोकांकडून असे नेहमी म्हटले जाते, की शेअर बाजार हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आहे, आणि यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला संयम राखणे खूप महत्वाचे आहे. तुमचा संयमच तुम्हाला शेअर बाजारात करोडपती बनवेल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी सखोल संशोधन आणि माहिती याच आधारे आपले पैसे लावा. आज या लेखात आपण अश्याच एका शेअर बद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांच्या गुंतवणूकदारांनी संयमाने या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून आता करोडो रुपयांचा परतावा कमवला आहे.

SRF कंपनीचा स्टॉक :
1 जानेवारी 1999 रोजी SRF कंपनीचा शेअर फक्त 2.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2008 येता येता ह्या स्टॉकच्या किमतीत जवळजवळ 11 पट अधिक वाढ झाली होती. शेअर बाजारात लिस्ट झाल्याच्या एका दशकानंतर 2014 च्या सुरुवातीला स्टॉकची किंमत 43.51 रुपयांवर जाऊन पोहोचली होती. सध्या म्हणजेच 14 सप्टेंबर 2022 रोजी SRF कंपनीचा शेअर 2829 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 23 वर्षात ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना आज पर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच तब्बल 1,32,533 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

एक महिन्यात दिलेला परतावा :
मागील महिन्यात ह्या स्टॉक ने कमालीची कामगिरी केली असून आपल्या भागधारक भरघोस परतावा मिळवून दिला आहे. जर आपण गेल्या महिन्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर, NSE वर एका महिन्यात SRF कंपनीच्या शेअरची किंमत 2493.85 रुपये होती, जी वाढून 2730.20 रुपये पर्यंत गेली आहे. फक्त 30 दिवसांच्या ह्या स्टॉकमध्ये इतकी भरमसाठ वाढ झाली आहे की, शेअरची किंमत जवळपास 9.48 टक्केनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत, SRF कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 15.91 टक्के इतका भरघोस परतावा मिळवून दिला आहे. जर आपण एका वर्षात दिलेल्या परताव्यावर नजर टाकली तर आपल्याला असे दिसेल की, या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत वर्षभरापूर्वी किंमत 2137.10 रुपये होती, ती आता वाढून 2730.20 रुपये पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना ह्या वाढीमुळे 27 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळाला असणार.

मागील पाच वर्षाचा परतावा :
जर आपण SRF कंपनी च्या मागील पाच वर्षाच्या परताव्याचे निरीक्षण केले तर असे दिसेल की, स्टॉकमध्ये दर वार्षिक वाढीचे प्रमाण सकारात्मक आहे. कंपनीच्या शेअरने मागील पाच वर्षांत आपल्या भागधारकांना 762 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. दहा वर्षाच्या चार्टचे निरीक्षण केल्यास आपल्याला ह्या स्टॉकने दिलेल्या परताव्याची व्याप्ती कळेल. मागील दहा वर्षात SRF कंपनीच्या स्टॉकची किंमत BSE निर्देशांकावर जवळपास 6025 टक्क्यांनी वर गेली आहे. सुरवातीपासून ते आतापर्यंतच्या संपूर्ण 23 वर्षात SRF कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 1,32,533 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of SRF limited share price return on 15 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)SRF(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x