18 November 2024 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

Penny Stocks | या कंपनीने केली बोनस शेअर्सची घोषणा, 7 रुपयाच्या स्टॉकने गुंतवणूकदारांचे 1 लाख झाले 17 कोटी, छप्परफाड परतावा

Penny Stocks

Penny Stocks | टोरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही फार्मास्युटिकल उद्योगातील एक दिग्गज कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल तब्बल 51,456.63 कोटी रुपये आहे. आज आम्ही या लेखात तुम्हाला अशा एका जबरदस्त स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये नुकताच बोनस शेअर्स जाहीर झाले आहेत, आणि त्या कंपनीचे गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. या कंपनीचे नाव आहे – Torrent Pharmaceuticals Ltd. टोरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही फार्मास्युटिकल उद्योगातील एक प्रसिद्ध अशी दिग्गज कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल तब्बल 51,456.63 कोटी रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊ की गुंतवणूकदार बोनस शेअर्स घेऊन करोडपती कसे झाले?

शेअर्सची किंमत आणि बोनस इतिहास : Torrent Pharmaceuticals Share Price :
9 सप्टेंबर रोजी Torrent Pharmaceuticals Ltd च्या शेअर्सची किंमत प्रति शेअर 1,516.05 रुपयेवर ट्रेड करत होते. मागील बंदच्या तुलनेत शेअर्समध्ये 0.44 टक्के वाढ झाली आहे. 6 जुलै 2001 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.04 रुपये होती. आता शेअरची किंमत 1,516.05 रुपये वर पोहोचली आहे. या कालावधीत, या कंपनीने आपल्या भागधारकांना आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 21,434.80 टक्के परतावा मिळवून दिला आहे. सुरुवातीच्या काळात कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 7.04 रुपये होती. जर तुम्ही त्यावेळी ह्या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुमच्या आता ह्या कंपनीचे एकूण 14,204 शेअर्स असले असते. कंपनीने एकूण 3 वेळा बोनस जारी केला आहे. पहिल्यांदा कंपनीने 2006 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस जाहीर केले होते, दुसऱ्यांदा 2013 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस आणि अलीकडे 2022 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस वितरीत केले आहेत.

बोनस इश्यू :
कंपनीचा पहिला बोनस इश्यू 20 फेब्रुवारी 2006 रोजी 1:1 च्या प्रमाणात जाहीर करण्यात आला होता. म्हणजेच, जर समजा तुमच्याकडे कंपनीचे सुरुवातीपासून 14,204 शेअर्स असले असते, तर ते बोनसच्या घोषणेनंतर 28,408 शेअर्समध्ये रूपांतरित झाले असते. बोनस जाहीर झाले तर गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य आणि शेअरहोल्डिंग टक्केवारी दोन्हीही बदलतात. 2013 आणि 2022 मध्ये कंपनीने पुन्हा 1:1 च्या प्रमाणात बोनस जारी केला होता आणि त्यावर 3 वेळा बोनस शेअर्स जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदाराच्या शेअर्सची एकूण संख्या 1,13,632 वर पोहोचली असेल. यामुळे शेअरची किंमत तीन वेळा बोनस शेअर्स झाल्यामुळे तब्बल हजार पटीने वाढली आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर तब्बल 17.22 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळाला असेल.

टोरेंट फार्मा कंपनीबद्दल सविस्तर :
टोरेंट फार्मा कंपनी फार्मास्युटिकल क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी आहे. ह्या कंपनीच्या शाखा ब्राझील आणि जर्मनीमध्ये देखील आहेत. फार्मा बाजारपेठेतील सर्वाधिक हिस्सा होल्ड केलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये टोरेंट फार्मा ही क्रमांक 1 ची कंपनी म्हणून ओळखली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Torrent pharmaceutical Share Price has declared bonus on 11 September 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(537)torrent pharma(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x