Penny Stocks | लाईफ बना दे, या पेनी स्टॉकने 28000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक माहिती आहे का?
Penny Stocks | 21 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजार अस्थिर स्थितीत नकारात्मक अंकांनी बंद झाला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 104.25 अंकांनी म्हणजेच 0.18 टक्क्यांनी वधारला आणि 59,307.15 वर ट्रेड करत होता. निफ्टीमध्ये 12.30 अंक म्हणजेच 0.07 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि निफ्टी 17,576.30 वर बंद झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1404 शेअर्स वाढले होते, तर 1920 शेअर्स पडले होते. 136 शेअर्सची किंमत सपाट होती. अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HUL आणि SBI लाइफ इन्शुरन्स हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढलेले लाभार्थी शेअर्स होते. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, डिव्हिस लॅब्स, अदानी पोर्ट्स आणि यूपीएल मध्ये पडझड पाहायला मिळाली होती.
सेन्सेक्सची कामगिरी पहिली तर मागील 5 वर्षांत त्यात 79 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणजेच दीर्घकाळात सेन्सेक्समध्ये मजबूत वाढ दिसून आली आहे. अशा काळात काही शेअर्स असे आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मालामाल केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरचे सविस्तर तपशील.
Triveni Engineering :
आपण ज्या कंपनीच्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “Triveni Engineering”. त्रिवेणी इंजिनिअरिंग कंपनीचा स्टॉक मागील 20 वर्षांमध्ये जबरदस्त वाढला आहे. 5 जुलै 2002 रोजी NSE निर्देशांकावर हा स्टॉक 0.73 पैसे किमतीवर ट्रेड करत होता, तर सध्या या स्टॉकची किंमत 271.85 रुपये आहे. या स्टॉकने आतपर्यंत 37,139.7 टक्केचा परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून पैसे 372 पेक्षा जास्त पटीने वाढवले आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 28000 रुपये लावले होते, त्यांना आता 1 कोटींहून अधिक परतावा मिळाला आहे.
5 वर्षांतील परतावा :
27 ऑक्टोबर 2017 हा स्टॉक रोजी 188.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काल हा स्टॉक 271.85 रुपयेवर बंद झाला होता. या कालावधीत स्टॉकमध्ये 188.44 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. याचा अर्थ असा की मागील 5 वर्षांत या स्टॉक मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 3 पट अधिक वाढले आहेत. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 2.88 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.
10 वर्षातील परतावा :
19 ऑक्टोबर 2012 रोजी हा स्टॉक 22.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तर काल हा स्टॉक 271.85 रुपयेवर बंद झाला होता. या कालावधीत स्टॉकमध्ये 1094.95 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. मागील 10 वर्षांत या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून लोकांच्या पैशात 11.95 पटीने वाढ झाली आहे आणि त्यांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 11.95 लाख रुपये झाले आहे.
उर्वरित कालावधीचा परतावा :
त्रिवेणी कंपनीच्या स्टॉकने गेल्या 1 वर्षाचा आपल्या गुंतवणूकदारांना 43.04 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने लोकांचे 19.37 टक्के नुकसान केले आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक फक्त 3.76 टक्क्यांनी वाढला आहे. 2022 या वर्षात हा स्टॉक आतापर्यंत 21.28 टक्के वधारला आहे. त्याच वेळी, गेल्या 2 वर्षां या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 276.78 टक्के परतावा कमावून दिला आहे.
कंपनीचा प्रोफाइल :
त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मुख्यतः कृषी आणि अभियांत्रिकीमधील वैविध्यपूर्ण सेवा देणारी आघाडीची कंपनी आहे. त्रिवेणी कंपनी 17 जागतिक दर्जाच्या सुविधांसह, भारतातील साखर, इथेनॉल आणि अल्कोहोल, पॉवर ट्रान्समिशन आणि वॉटर ट्रीटमेंट सोल्युशन्स बाजारपेठेत व्यवसाय करण्यात आघाडीवर आहे. याशिवाय त्रिवेणी अनेक FMCG ब्रँड्स जसे की शगुन, जर्मकेअर आणि सुपरगार्ड यांची मालक आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Triveni Engineering share price return on investment on 25 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा