20 January 2025 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO 8th Pay Commission | सरकारी क्लार्क पासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत इतका पगार आणि पेन्शन वाढणार, ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700 IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय शेअर Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे दर अजून वाढले | पहा आज किती वाढ झाली

Petrol Diesel Price

मुंबई, १४ ऑक्टोबर | सामान्य लोकांना आजही पेट्रोल आणि डिझलेच्या वाढत्या किमतींमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. कारण आजही सामान्यांना कोणताही दिलासा न मिळता दर अजून वाढले आहेत. नव्या किमतींप्रमाणे संबंधित कंपन्यांनी (Petrol Diesel Price) आज जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 आणि डिझेलच्या प्रतिलीटर किमतींत 37 पैशांची वाढ करण्यात आली आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सामान्यांच्या खर्चात अजून वाढ होणार आहे आणि महागाईलाही तोंड द्यावं लागू शकतं.

Petrol Diesel Price. Petrol price has been hiked by 34 paise and diesel by 37 paise per liter as announced today. Rising petrol and diesel prices today will further increase the cost of living for the common man and may lead to inflation :

संबधित कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या किमतींनुसार मुंबई शहरात पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.75 रुपये आणि एका लीटर डिझेलसाठी 101.40 रुपये खर्च करावे लागत आहेत. दुसरीकडे पॉवर पेट्रोलची प्रतिलीटर किमती 114.69 रुपये इतकी पोहोचली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्ली शहरात पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 104.78 आणि 93.54 रुपयांवर पोहोचला आहे. बदल करण्यात आलेले दर आज संपूर्ण दिवसभर लागू राहतील.

दरम्यान, या महिन्यात इंधनांचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. कारण याच महिन्याच्या केवळ सुरुवातीच्या दहा दिवसात पेट्रोलच्या दरांमध्ये 2.80 रुपयांची आणि डिझेलच्या किंमतीत एकूण 3.30 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

तुम्ही SMS’च्या मदतीने रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासू शकता. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज पहाटे 6 वाजता बदलत असतात. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानुसार RSP सोबत तुमच्या शहराचा CODE नंबर टाइप करून 9224992249 या क्रमांकावर तुम्हाला SMS पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा कोड निरनिराळा असतो. BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice असं टाईप करून 9222201122 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घेऊ शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Petrol Diesel Price as on 14 October 2021 checkout updated rates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x