5 November 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ | काय आहेत आजचे नवे दर

Petrol Diesel Price

मुंबई, 27 ऑक्टोबर | सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.

Petrol Diesel Price. Indian petroleum companies on Wednesday hiked petrol and diesel prices. Accordingly, petrol has gone up by 35 paise per liter and diesel by 37 paise. These rates will be applicable throughout the day today :

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. त्यानुसार पेट्रोल प्रतिलीटर 35 पैसे तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. मात्र, यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीचा प्रवास पुन्हा एकदा वरच्या दिशेने सुरु झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबरला देशभरात इंधनाचे दर स्थिर होते.

पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.80 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.75 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.94 आणि 96.67 रुपये इतका आहे.

तुम्ही SMS’च्या मदतीने रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासू शकता. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज पहाटे 6 वाजता बदलत असतात. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानुसार RSP सोबत तुमच्या शहराचा CODE नंबर टाइप करून 9224992249 या क्रमांकावर तुम्हाला SMS पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा कोड निरनिराळा असतो. BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice असं टाईप करून 9222201122 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घेऊ शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Petrol Diesel Price as on 27 October 2021 checkout updated rates.

हॅशटॅग्स

#GoldPrice(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x