Petrol Diesel Price | मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग | सलग तिसऱ्या दिवशी वाढ
मुंबई , ०३ ऑक्टोबर | इंधन दराचा उडालेला भडका कायम आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक (Petrol Diesel Price) गाठला असून, दररोज किंमती वाढत आहेत. गेल्या तीन सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील प्रमुख चार महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत.
Petrol Diesel Price. Indian oil distributors hiked petrol-diesel prices on Sunday (October 3). Petrol price has been hiked by 25 Paise per liter. Diesel price has been hiked by 30 Paise per liter. Rising fuel prices have pushed petrol-diesel prices to new highs :
भारतीय तेल वितरक कंपन्यांनी रविवारी (3 ऑक्टोबर) पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात लिटरमागे २५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
प्रमुख शहरातील आजचे दर काय आहेत?
तेल वितरक कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलच्या दरात ३० वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीप्रमाणे देशातील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरांची तुलना केली, तर सर्वाधिक दर मुंबईत आहेत.
दिल्लीत पेट्रोल १०२.३९ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल ९०.७७ रुपये लिटर आहे. मुंबईत पेट्रोल लिटरमागे १०८.४३ रुपये, तर डिझेल ९८.४८ रुपये लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोल १०३ रुपये प्रतिलिटर असून डिझेल ९३.८७ रुपये लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलचे दर १००.०१ लिटर असून, डिझेल ९५.३१ प्रतिलिटर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याचे परिणाम भारतात दिसत आहे. देशातील इंधनाचे दर झपाट्याने वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. भारतात आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 78 डॉलरवर पोहोचले आहेत. त्याची झळ थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागली आहे.
तुमच्या शहरातील इंधनाचे दर असे घ्या जाणून:
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल वितरक कंपन्या प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती निर्धारित करतात (दरात वाढ किंवा घट). त्याची माहिती कुणालाही घेता येऊ शकते. तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्यायचे असतील, RSP असा मेसेज 9224992249 या क्रमांकावर केल्यानंतर दरांची माहिती मिळेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Petrol Diesel Price hike continue since three days in India.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS