मोदी सरकारने जनतेचे जगणे कठीण करून ७ वर्षांत इंधनामधून १३.५ लाख कोटी कमावले | भाजपचे आंदोलक आहेत कुठे? - काँग्रेस
नवी दिल्ली, २९ सप्टेंबर | पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी (Petrol Diesel Price) ओलांडली आहे. एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे गेले आहेत? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी विचारला आहे.
Congress has accused the Modi government of earning Rs 13.5 lakh crore in seven years. When the fuel price went up by one rupee, where did the BJP leaders and activists who took to the streets in protest go? Petrol Diesel Price :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लुट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास उपकराच्या (CESS) माध्यमातून घेतले जात आहेत. तर ४ रुपये कृषी उपकराच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लिटर आहे.
मोदी सरकारकडून इंधनावरील करात भरमसाठ वाढ:
मोदी सरकारने डिझेलवर ८०० टक्केहून अधिक तर पेट्रोलवर २५० टक्केहून अधिक उत्पादन शुल्क (Excise Duty) लावून पेट्रोलचे दर १०७. २६ रुपये प्रति लिटरवर वाढविले आहेत. तर डिझेलचे दर ९६. ४१ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवले आहेत.
मोदी सरकारने १३.५ लाख कोटी रुपये कमावले:
पुढे श्रीरंग बरगे म्हणाले, की आज पुन्हा एलपीजी गॅस सिलींडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केल्याने गॅस सिलिंडरचा दर ८५९ रुपये झाला आहे. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष आहे. मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. मोदी सरकारने ७ वर्षात चक्क १३.५ लाख कोटी रुपये कमावले असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घेऊन सामान्यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणीही काँग्रेस कमिटीचे सचिव बरगे यांनी केली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Petrol diesel price hike Modi government earned 13 lakh crore rupees in 7 years said congress.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH