21 January 2025 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Petrol Diesel Price | उत्पादन शुल्क खेळ काही दिवसांसाठी? | पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढणार - ऊर्जा तज्ज्ञांचं मत

Petrol Diesel Price

मुंबई, 05 नोव्हेंबर | केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल, डिझेल दरात कपात झाली आहे. परंतु, ही दरकपात काही दिवसांचं स्वप्नं ठरण्याची शक्यता आहे. कारण उर्जा क्षेत्रात काम करणारे अभ्यासक आणि तज्ज्ञ नरेंद्र तनेजा सांगतात की नजीकच्या काळात पेट्रोल, डिझेल दर पुन्हा वाढतील. त्यामुळे दिवाळीत झालेल्या इंधन दरकपातीवरुन ग्राहकांनी हुरळून जाण्याचे (Petrol Diesel Price) कारण नाही, असा इशारा या विषयातील अभ्यासक देत आहेत.

Petrol Diesel Price. Petrol and diesel prices have been reduced due to reduction in excise duty by the central government. But expert working in the energy sector, says that petrol and diesel prices will go up again in the near future :

नरेंद्र तनेजा यांनी एएनआयसोबत बोलताना गुरुवारी सांगितलेकी, आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की,आपण तेल आयात करतो. तेल ही एक आयात करावा लागणारा घटक आहे. आज आपल्याला जवळपास 86% तेल आयात करावे लागते. तेलाच्या किमती सरकारच्या हातात नाहीत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही यंत्रणा नियंत्रणमुक्त वस्तू आहेत. जुलै 2010 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळातील सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले आणि 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल नियंत्रणमुक्त केले.

तनेजा पुढे सांगतात, बाजाराचा नियम आहे. जेव्हा मागणी आणि पुरवठा यांच्या असमानता निर्माण होते. तेव्हा किमती वाढतात. दुसरे कारण म्हणजे तेल विश्वात होणारी कमी गुंतवणूक. कारण अनेक देशांची सरकारे सौर उर्जा आणि इलेक्ट्रिक उर्जा यांसारख्या नव्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात गुंतवणूक कमी होते आहे. परिणामी कच्चे तेल अधिक महाग होत आहे.

कच्चा तेलाच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा केंद्र सरकार उत्पादन शुल्क वाढवते. जेव्हा तेल खूप महाग होते तेव्हा सरकार तेलाच्या किमती कमी करते. कोरोना काळात तेलाची मागी 35 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. जेव्हा विक्री कमी होईल तेव्हा सरकारचे उत्पादन आपोआपच कमी होते. आता कोवीडपूर्वीच्या काळाप्रमाणे सरकारचे उत्पादन वाढत आहे, असेही तनेजा सांगतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Petrol Diesel Price will go up again in the near future say experts.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x