16 April 2025 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

आता अजून एक कंपनी मुख्य कार्यालयासहित महाराष्ट्र सोडून दुसऱ्या भाजपशासित राज्यात जाणार, सुशिक्षित तरुणांचं टेन्शन वाढणार

PhonePe Shifting

PhonePe Shifting To Karnataka ​​| कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीत जात आहेत की महाराष्ट्रासाठी असा खोचक प्रश्न विचारत टीका केली होती. फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे :
फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्प गुजरातला का गेला? यासंदर्भात सरकारकडून अद्यापही कुठलंच अधिकृत उत्तर आलेलं नाही. आरोप-प्रत्यारोप झाले. आवाज उठवल्यानंतर चौकशीची धमकीही दिली जाते. मात्र अजूनही महाराष्ट्रातून एवढा मोठा प्रकल्प गुजरातला का गेला? याबाबत सरकारकडून स्पष्ट उत्तर देण्यात आलेलं नाही.

यानंतर आता फोनपेने महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्त पत्रात दिलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मुंबईतील PhonePe कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. PhonePe च्या या हालचालीमुळे महाराष्ट्रात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

फोन पेने पत्रात काय म्हंटले:
याद्वारे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की कंपनीने तिचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यास सक्षम होण्यासाठी कंपनी कायदा, 2013 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज प्रस्तावित केला आहे. ज्यासाठी कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफारची पुष्टी मिळावी यासाठी 16 ऑगस्ट, 2022 येथे झालेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला.

PhonePe

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एकतर MCA21 पोर्टलवर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करू शकते किंवा कारण देऊ शकते. किंवा रजिस्टर पोस्टाने त्याचे/तिचे हिताचे स्वरूप सांगणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह समर्थित आणि विरोधाच्या कारणासह असलेले पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग कडे एव्हरेस्ट 5 वा मजला 100 मरीन ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र- 400002 या पत्यावर, ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याच्या प्रतिसह अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात खाली नमूद केलेल्या पत्यावर पाठवू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PhonePe Shifting Head office To Karnataka check details 22 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PhonePe Shifting(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या