Policybazaar Share Price Price | पीबी फिनटेक शेअर तेजीच्या ट्रॅकवर, स्टॉक वाढीतून मोठा परतावा मिळू शकतो, तज्ज्ञांनी काय दिला सल्ला
Highlights:
- Policybazaar Share Price
- विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ नोंदवली
- आजची शेअरची किंमत
- ब्रोकरेज हाउस जेएम फायनान्शिअल अहवाल
- EBITDA सकारात्मक
- शेअर 37 टक्के कमजोर
- आर्थिक तिमाही निकाल
Policybazaar Share Price | पॉलिसीबाजार आणि पैसा बाजारची ऑपरेटर कंपनी पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाईची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मार्च 2023 तिमाहीत पीबी फिनटेक कंपनीने मजबूत तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यानंतर ब्रोकरेज हाऊसेस स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान झाले होते, मात्र आता स्टॉक तेजीत येण्यासाठी सज्ज झाला आहे.
विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ नोंदवली
ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, पीबी फिनटेक कंपनीने मार्च 2023 तिमाहीत अप्रतिम कामगिरी केली आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एकूणच कंपनीच्या तोट्यात जबरदस्त घट झाली आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीला 9 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे.
आजची शेअरची किंमत
मागील वर्षी पीबी फिनटेक कंपनीला 219.6 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 620.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज हाउस जेएम फायनान्शिअल अहवाल
ब्रोकरेज हाउस जेएम फायनान्शिअलने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पीबी फिनटेक कंपनीने मार्च 2023 तिमाहीत अप्रतिम कामगिरी केली आहे. तिमाही आणि वार्षिक आधारावर पीबी फिनटेक कंपनीची टॉपलाइन वाढ 42.5 टक्के आणि 60.9 टक्के नोंदवली गेली आहे.
EBITDA सकारात्मक
त्याच वेळी कंपनीने 870 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जो कंपनीच्या अंदाजापेक्षा 15.5 टक्के अधिक वाढला आहे. मार्च 2023 तिमाहीत, पीबी फिनटेक कंपनीचे मार्जिन 3.2 टक्के होते. यात तिमाही आधारावर 780 अंकांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा समायोजित EBITDA सकारात्मक आहे.
तिमाही आधारावर पीबी फिनटेक कंपनीच्या विम्याच्या प्रीमियममध्ये 18 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या एकूण व्यवसायाने 68 टक्के QoQ वाढ नोंदवली आहे. जीवन विमा पॉलिसींची विक्री मजबूत असल्याने कंपनीला मार्च तिमाहीत जास्त फायदा झाला आहे. पैसा बाजार कंपनीची वितरण वाढ तिमाही आधारावर 11 टक्के नोंदवली गेली आहे. कंपनीचा EBITDA देखील सकारात्मक आहे.
शेअर 37 टक्के कमजोर
PB Fintech कंपनीचे शेअर्स 15 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. कंपनीच्या शेअरची इश्यू किंमत 980 रुपये होती. तर स्टॉक 1444 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. सध्या हा स्टॉक 620 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे. स्टॉक आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 37 टक्के कमजोर झाला आहे. ते शेअरची किंमत आपल्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 57 टक्के कमजोर झाली आहे. या स्टॉकचा वार्षिक उच्चांक 748 रुपये होता. तर नीचांक 356 रुपये होता.
आर्थिक तिमाही निकाल
मार्च 2023 तिमाहीत, पीबी फिनटेक कंपनीला 9 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 219.6 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. या कालावधीत वार्षिक आधारावर कंपनीने 61 टक्क्यांच्या वाढीसह 869 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने विमा प्रीमियमच्या माध्यमातून 3586 कोटी रुपये संकलित केले होते. यात मागील वर्षाच्या तुलनेत 65 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. वार्षिक आधारावर कंपनीचे कर्ज वितरण 53 टक्क्यांच्या वाढीसह 3357 कोटी रुपयेवर पोहचले आहे. कंपनीने उत्पन्नाची वाढ, नवीन व्यवसायाची वाढ आणि नवीन व्यवसायाची उच्च कार्यक्षमता हे कंपनीच्या एकूण वाढीचे घटक निश्चित केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Policybazaar Share Price today on 25 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
- Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE