24 April 2025 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Poonawalla Fincorp Share Price | कमाईवाला शेअर! 2133 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर तज्ज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस

Poonawalla Fincorp Share Price

Poonawalla Fincorp Share Price | कोरोना महामारीमुले जगभरात लॉक डाऊन लागला, आणि त्यामुळे सर्व शेअर बजार क्रॅश झाले. बहुतांश कंपन्यांचे शेअर्स असे आपटले की, ते अजूनही वर येऊ शकले नाही. अनेक कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल ही केले आहे. असाच एक स्टॉक म्हणजे ‘पूनावाला फिनकॉर्प’ ने अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 22 लाख परतावा दिला होता. भारतीय ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 26 टक्क्यांनी वाढू शकतो. आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के घसरणीसह 289.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या NBFC कंपनीचे बाजार भांडवल 22,462.07 कोटी रुपये आहे. (Poonawalla Fincorp Limited)

पूनावाला फिनकॉर्प स्टॉक परतावा :
‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचा शेअर 29 मे 2020 रोजी कोरोना महामारीच्या काळात 13.10 रुपये किमतीवर आला होता. त्यानंतर स्टॉक 2133 टक्क्यांनी रिकव्हर होऊन 292.50 रुपयांवर पोहोचला. या काळात गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये वाढून 22 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. मागील वर्षी 13 एप्रिल 2022 रोजी स्टॉक 343.75 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमतवरून 15 टक्के स्वस्त झाला आहे. मागील वर्षी 20 जून 2022 रोजी हा स्टॉक 209.15 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होता.

स्टॉकची वाटचाल :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीने मजबूत कामगिरी केली होती. कंपनीव्यवस्थापनाने वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये AUM मध्ये 35-40 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 88 टक्के वाढीसह 150 कोटी रुपयेवर आला आहे. ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनी डिजिटायझेशनद्वारे आपली उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी मनुष्यबळावर कोणताही अतिरिक्त खर्च न करता आपला व्यवसाय विस्तार करत आहे.

तज्ञांनी नुकताच जाहीर केलेल्या अहवालात आर्थिक वर्ष 2023-25 मध्ये चक्रवाढ वार्षिक दराने ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचा AUM 40 टक्क्यांने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक तज्ञांनी आपल्या अहवालात ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचा निव्वळ नफा 51 टक्क्यांनी वाढेल असाही अंदाज व्यक्त केला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीच्या शेअरसाठी 350 रुपये टार्गेट किमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने स्टॉकसाठी 368 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Poonawalla Fincorp Share Price on 03 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Poonawalla Fincorp Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या