17 April 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

PPF Calculator | फक्त शेअर किंवा म्युच्युअल फंडस् नव्हे, ही पीपीएफ योजना सुद्धा मजबूत परतावा देऊ शकते

PPF Calculator

PPF Calculator | माणसाने आयुष्यात पैशांपेक्षा माणसाला जास्त महत्व दिले पाहिजे हे वाक्य आजवर तुम्ही अनेकदा ऐकल असेल किंवा ऐकवलं असेल. तसेच पैसा हा फक्त चांगल्या मार्गानेच कमवावा असे देखील म्हटले जाते. मात्र अनेक जण असा विचार करतात की, जास्त पैसा कमवण्यासाठी फक्त चांगला मार्ग धरूण चालत नाही. मात्र हे विचार आता लवकरच हृबदलणार आहेत. कारण शासनाने तुमच्यासाठी अशी एक योजना आणली आहे ज्यात तुम्ही गुंतवणूक करुण कमी वेळेतच करोडपती होऊ शकता. या योजनेत तुम्हाला वर्षाला फक्त ७५०० रुपये गुंतवण्याची गरज आहे.

दिर्घकाळासाठी आहे ही गुंतवणूक
दिर्घकालीन गुंतवणूक नेहमीच जास्त फलदायी ठरते. यात तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा पर्याय निवडलात तर तो तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. या योजनेत तुम्हाला भरगोस परतावा मिळतो. जर तुम्ही दर वर्षी १२,५०० रुपये दर महा गुंतवणूक केली तर तुम्हाला एका वर्षाला १.५ लाख रुपये मिळतात. तसेच करोडपती होण्यासाठी किती आणि कशी गुंतवणूक करावी याची माहिती तुम्हाला असायला हवी.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये मिळेल ७.१ टक्के व्याज
सध्याच्या घडीला या योजनेत शासकीय नियमांनुसार ७.१ टक्के व्याज दिले जाते. हा एका वर्षाचा दर आहे. १५ वर्षांच्या कालावधीसाठी यात गुंतवणूक करायला हवी. यात तुम्ही महिना १२५०० रुपये गुंतवाल तर १५ वर्षांनी त्याचे ४०,६८,२०९ रुपये मिळतील. यात तुमची गुंतवणूक २२.५ लाख तर व्याज १८,१८,२०९ रुपये इकते असेल.

यानुसार करा व्हा १ कोटींचे मालक
वयाच्या ३० व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर १२५०० ने  १५ वर्षांचे ४०,६८,२०९ रुपये तुमच्या खात्यात असतील. पैसे काढण्याऐवजी ५ वर्षांनी मुदत वाढवा. म्हणजे एकूण २० वर्षांनी तुम्हाल ६६,५८,२८८ रुपये मिळतील. तसेच २५ वर्षांनी हिच रक्कम १,०३,०८,०१५ रुपये होईल.

वयाच्या ५५ व्या वर्षी व्हाल करोडपती
जर तुम्ही २५ व्या वयात दर महा १०,००० रुपये गुंतवले तर ७.१ टक्के व्याज दराने १५ वर्षांत तुमचे ३२,५४,५६७ रुपये जमा होतील. यात पाच वर्षे आणखीन वाढवाल तर २० वर्षांनी ५३.२६,६३१ जमा होतील. २५ वर्षांत ८२,४६,४१२ रुपये आणि ३० वर्षांत १,२३,६०,७२८ रुपये जमा होतील. असे तुम्ही वयाच्या ५५ व्या वर्षी करोडोंचे मालक व्हाल.

ईएमआय कमी ठेवण्याचा पर्यया
या योजनेत तुम्ही महिना फक्त ७५०० रुपये गुंतवले तर करोडपती होण्यासाठी ही गुंतवणूक तुम्हाला वयाच्या २० व्या वर्षीच सुरू करावी लागेल. यातही ७.१ टक्के व्याज दराने २० वर्षांत ३९,९४,९७३ रुपये जमा होतील. तर २५ वर्षांनी ही रक्कम ६१,८४,८०९ रुपये होईल. असे करत ३५ वर्षांनी म्हणजे तुमचे वय ५५ असताना तुम्हाला १.३६.१८.७१४ रुपये मिळतील. या योजनेचा निट अभ्यास करुण गुंतवणूक केल्याने निश्चीतच तुम्ही करोडपती व्हाल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PPF Calculator Invest in this scheme and become a millionaire 31 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या