27 April 2025 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

PPF Calculator | पीपीएफ गुंतवणुकीतून सुद्धा तुम्ही 5 कोटी रुपये उभे करू शकता, नियमित गुंतवणुकीचं गणित समजून घ्या

PPF Calculator

PPF Calculator | आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर, आता बँका मुदत ठेवीवरील व्याजदरही वाढवत आहेत, तेव्हा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सरकार बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेणार आहे, आणि त्यानंतर पीपीएफचे नवीन व्याजदर जाहीर केले जातील. अशी शक्यता आहे की PPF वरील व्याजदर वाढवले जातील.

PPF कॅल्क्युलेटर:
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ही सरकार द्वारे संचालित, गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुरक्षित योजनांमध्ये मानली जाते. तसेच या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्ही भरघोस परतावा मिळवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुमच्या द्वारे गुंतवलेले पैसे शेअर बाजारात गुंतवले जात नाहीत. अशा परिस्थितीत बाजारातील अस्थिरतेचा पीपीएफ मध्ये गुंतवलेल्या पैशांवर कोणताच नकारात्मक परिणाम होत नाही.

आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलत दिली जाते. तसेच, मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या व्याज परताव्यावर कोणताही कर भरावा लागत नाही. तुम्ही पीपीएफ खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला मासिक किंवा त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक रक्कम जमा करण्याची मुभा दिली आहे.

पीपीएफवर 7.1 टक्के व्याज परतावा :
सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो. पण आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर जेव्हा सर्व बँका एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत, तेव्हा सप्टेंबरच्या अखेरीस सरकार बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेईल, आणि पीपीएफचे व्याजदर वाढवले जातील. 2015-16 मध्ये PPF वर 8.7 टक्के व्याज परतावा मिळत होता. सध्या मिळणारा व्याज परतावा 2015-2016 च्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा परतावा थोडा कमी झाला आहे.

कमाल गुंतवणूक :
PPF खात्यात, तुम्ही कमाल 15 वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात. आणि जर तुम्हाला पैशाची गरज नसेल तर तुम्ही 15 वर्षांनंतर तुमचे PPF खाते दर पाच पाच वर्षांच्या कालावधीसाठी पुढे वाढवू शकतात, अशा प्रकारे तुम्ही त्यात कमाल 35 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. पुढील काही वर्षासाठी पीपीएफ योजना वाढवायची असल्यास यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल.

सध्या तुमचे वय ही 25 वर्ष असेल आणि निवृत्तीच्या 60 व्या वर्षापर्यंत पुढील 35 वर्षे पीपीएफ खात्यात तुम्ही प्रती वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवत राहिल्यास मुदत पूर्ती झाल्यावर तुम्हाला 5 कोटी रुपये परतावा मिळू शकतो. ज्यामध्ये 52,50,000 रुपये तुमची गुंतवणूक केलेली रक्कम असेल, त्यावर तुम्हाला 1,74,47,857 रुपये व्याज परतावा दिला जाईल. ह्या व्याज परतव्यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल. आणि तुम्ही तुमच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत एकूण 45 वर्षे PPF योजनेमध्ये गुंतवणूक करत राहिल्यास तुमची एकूण गुंतवणूक 67,50,000 रुपये असेल, या गुंतवणुकीवर तुम्हाला 4,72,99,295 कोटी रुपये परतावा मिळेल. आणि जर सरकारने पीपीएफवरील व्याजदर वाढवले ​​तर तुमचा परतावा नक्कीच 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF Calculator investment benefits for long term return on 18 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या