22 November 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

PPF EPF GPF | पीपीएफ, ईपीएफ आणि जीपीएफ या 3 योजनांमध्ये फरक काय? एकूण परतावा आणि विविध फायदे समजून घ्या

PPF,EPF, GPF

PPF, EPF, GPF | भविष्य निर्वाह निधी योजना ही एखाद्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक पाठिंबा देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. PPF ही दीर्घकालीन बचत म्हणून नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने स्थापन केलेली गुंतवणूक योजना आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) यांसारख्या गुंतवणूक योजना कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या.

चला तर जाणून घेऊ या सर्व भविष्य निर्वाह निधीतील फरक आणि फायदे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी/EPF :
EPFO संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ गुंतवणूकीचा फायदा मिळतो. 15,000 रुपये प्रति महिना मूळ वेतन असलेल्या कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळावे म्हणून 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना EPF स्वीकारणे बंधनकारक आहे. किमान आधारभूत वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा गुंतवणूक पर्याय लाभदायक मानला जातो. नियोक्ता या EPFO स्कीममध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के योगदान देतो आणि कर्मचारीही समान योगदान जमा करतो. कर्मचारी त्याचे योगदान 12 टक्के पेक्षा जास्तही वाढवू शकतो.

EPFO चे फायदे:
* निवृत्तीच्या वेळी एकरकमी पीएफ काढण्याची सुविधा मिळते.
* कर्मचारी निवृत्ती वेतन योजना/EPS अंतर्गत नियमित पेन्शन लाभ मिळवता येतो.
* एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स/EDLI अंतर्गत विमा फायदे मिळवता येतात.
* नियोक्त्याच्या 12 टक्के योगदानापैकी, 8.33 टक्के EPS मध्ये जमा होते आणि बाकीचे EDLI कडे जाते, तर कर्मचाऱ्यांचे 12 टक्के योगदान EPF मध्ये जाते.
* कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना/EPFO सरकारशी सल्लामसलत करून व्याजदर निश्चित करतात.
* इतर दोन भविष्य निर्वाह निधी योजनेच्या तुलनेत हा व्याजदर दर जास्त आहे.
* मूळ वेतनाच्या 12 टक्क्यांपर्यंत नियोक्त्याचे संपूर्ण योगदान करमुक्त असते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी/ PPF :
या योजनेमध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो, मग तो सैन्यात नोकरीला असो, व्यावसायिक मालक असो, किंवा खाजगी नोकरीत असो. PAN कार्ड असलेले सर्व भारतीय नागरिक स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी PPF योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र असतील. एका आर्थिक वर्षात त्याचे पॅन नंबर वापरून उघडलेल्या सर्व PPF खात्यांमध्ये कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्ष असून जो मॅच्युरिटीनंतर दर 5 वर्षांनी वाढवता येईल.

पीपीएफ योजनेचे फायदे :
* पीपीएफ योजनेतील व्याज दर तिमाही आधारावर भारत सरकारद्वारे जाहीर केला जातो.
* सामान्यतः विद्यमान मुदत ठेव दरांपेक्षा व्याज दर वाढवला जातो.
* खातेदार मॅच्युरिटीवर संपूर्ण रक्कम एकरकमी काढू शकतो किंवा योगदानासह किंवा त्याशिवाय PPF खाते 5 वर्षांसाठी आणखी वाढवू शकतो.
* योजना सुरू केल्याच्या तिसऱ्या ते सहाव्या वर्षापर्यंत PPF खातेधारक आपल्या गुंतवणूक ठेवींवर कर्ज घेऊ शकतो.
* सहावे वर्ष संपल्यानंतर आपल्या PPF खात्यातून आंशिक पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

सामान्य भविष्य निर्वाह निधी/GPF :
31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी सरकारी नोकरीत काम करणारे सरकारी कर्मचारी आणि ज्यांना सेवानिवृत्ती नंतर जुनी पेन्शन योजना अंतर्गत पेन्शन पेमेंट मिळत आहे ते सर्व लोक GPF योजनेत पात्र आहेत. जे सरकारी कर्मचारी या योजनेत पात्र आहेत ते त्यांच्या वेतनाच्या 100 टक्के योगदान जमा करू शकतात. किमान योगदान मर्यादा 6 टक्के आहे. PPF योजनेप्रमाणे या योजनेत ही कर्मचारी योगदान देतात, मात्र यात फरक असा आहे की GPF योजना सामान्य लोकांसाठी उपलब्ध नसून गुंतवणुकीची रक्कम मर्यादा एका आर्थिक वर्षात 5 लाख रुपये ठरवण्यात आली आहे.

GPF योजनेचे फायदे:
GPF योजना पूर्णपणे सुरक्षित असून त्यात मिळणारा व्याजदर सध्याच्या FD मध्ये मिळणाऱ्या व्याज दरांपेक्षा खूप जास्त आहे. निवृत्तीच्या वेळी, GPF योजनेमध्ये जमा केलेली रक्कम तुम्ही एकरकमी काढू शकता. तुम्ही आर्थिक अडचणीत किंवा खाजगी कामासाठी आंशिक पैसे काढू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF EPF GPF Investment benefits for investors on 03 November 2022.

हॅशटॅग्स

PPF EPF GPF(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x