18 April 2025 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
x

PPF Interest Rates | सरकारने पीपीएफ व्याज वाढवलं का? तुमच्या गुंतवणुकीबाबत महत्वाची माहिती समोर

PPF Interest Rates

PPF Interest Rates | सरकारकडून अनेक गुंतवणूक योजना चालवल्या जात आहेत. यापैकीच एक गुंतवणूक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाच्या (पीपीएफ) माध्यमातून सरकार गुंतवणूकदारांना दीर्घ काळासाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करते. त्याचबरोबर नव्या वर्षाआधी सरकारकडून पीपीएफबाबत निर्णय घेण्यात आल्याने पीपीएफ खातेधारकांना धक्का बसला आहे. (PPF Latest Interest Rates)

गुंतवणूकदारांना फायदा नाही
वास्तविक, पीपीएफ खातेधारकांना बऱ्याच काळापासून पीपीएफवरील व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता सरकारने पीपीएफच्या व्याजदराबाबत घोषणा केली आहे. पण यामुळे पीपीएफ खातेदारांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्याचबरोबर सरकारने पीपीएफ खात्यांवर देण्यात येणारा व्याजदर सध्या स्थिर ठेवला आहे.

व्याजदरात वाढ नाही
वास्तविक, सरकारकडून पीपीएफ खात्यांवरील व्याजदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पीपीएफवरील व्याजदर सरकारने स्थिर ठेवला आहे. सध्या सरकारकडून पीपीएफ खात्यांना वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज दिले जाते.

किती गुंतवणूक करू शकता
कोणताही भारतीय नागरिक पीपीएफ खाते उघडू शकतो. पीपीएफवर सरकारने ठरवून दिलेल्या दराने व्याज दिले जाते. त्याच वेळी, पीपीएफ खाते हे एक दीर्घकालीन खाते आहे आणि ते 15 वर्षानंतर परिपक्व होते. एका आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करता येते. त्याचबरोबर एका आर्थिक वर्षात पीपीएफमध्ये जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती
तिसऱ्या तिमाहीत किसान विकास पत्रावरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला, मात्र मुदतपूर्तीचा कालावधी १२४ महिन्यांनी कमी करून १२३ महिने करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर ७.४ टक्क्यांवरून ७.६ टक्के करण्यात आला. मासिक उत्पन्न खाते योजनेवर व्याजदर ६.६ टक्क्यांवरून ६.७ टक्के करण्यात आला, तर दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर तो ५.५ टक्क्यांवरून ५.७ टक्के करण्यात आला, तर ३ वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर तो ५.५ टक्क्यांवरून ५.८ टक्के करण्यात आला. पण पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससीच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PPF Interest Rates no hike from central government check details on 31 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PPF Interest Rates(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या