5 November 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

PPF Investment | तुम्ही दरमहा रु. 12500 या योजनेत गुंतवल्यास 1.5 कोटी रुपये बंपर परतावा मिळेल

PPF investment

PPF Investment | तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा PPF मध्ये कमीत कमी 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. यातून तुम्ही 1.5 कोटी रुपये परतावा कसे मिळवू शकता, आम्ही तुम्हाला याची आज सविस्तर माहिती देऊ कमी जोखीम आणि जास्त परतावा हा हेतूने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा सर्वात आकर्षक गुंतवणूक मार्ग आहे. PPF खाते सामान्यतः १५ वर्षांनी परिपक्व होते. जो कोणी खातेदार असतो तो त्यांचे पीपीएफ खाते पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवू शकतो.

पीपीएफ वरील व्याज दर परतावा :
तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, म्हणजे पीपीएफ द्वारे करमुक्त सेवानिवृत्ती निधी जमा करू शकता. ही सर्वात लोकप्रिय बचत योजनांपैकी एक असून तुम्हाला यात चक्रवाढ व्याज परतावा आणि कर सवलत लाभ देते.

पीपीएफ म्हणजे काय?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकार समर्थित एक छोटी बचत योजना असून ती जी मध्यम व्याज दर परतावा देते. या योजनेअंतर्गत कर सवलत आणि चांगला व्याज परतावा लाभही दिला जातो. त्याअंतर्गत मिळणारे व्याज तसेच परतावा आयकर कायद्या अंतर्गत करपात्र नाहीत. PPF मध्ये गुंतवणूक एकरकमी पद्धतीने किंवा आणखी सोपे पडावे म्हणून जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये करता येते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते किमान गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आणि कमाल एकरकमी गुंतवणूक मर्यादा ही 1.5 लाख रुपये आहे. हा योजनेचा सध्याचा व्याज दर परतावा 7.1 टक्के वार्षिक इतका आहे. तुम्ही एकदा गुंतवणूक सुरू केली की त्या PPF खात्याचा कालावधी 15 वर्षांचा असेल.

पीपीएफ कसे काम करते?
PPF हे पगारदार व्यक्तींसाठी एक सर्वोत्तम कर नियोजन करणाऱ्या साधनांपैकी एक आहे, कारण वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत वार्षिक कर कपातीसाठी पात्र आहेत. इतर सर्व लहान बचत योजनांप्रमाणे, PPF वरचे व्याज सरकार ठरवते आणि तर जास्तच असते. आर्थिक वर्ष 2022 च्या जानेवारी-मार्चसाठी, PPF वर सरकारने 7.1 टक्के व्याज जाहीर केला होता.

परतावा अंदाज :
दरमहा तुम्ही 12,500 रुपये गुंतवून 1 कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता. दरमहा रु. 12,500 किंवा वार्षिक 1.5 लाख रुपये PPF मध्ये गुंतवून त्यावरील 7.10 टक्के वार्षिक चक्रवाढ परताव्यासह तुम्ही सहजपणे रु. 1 कोटी पेक्षा जास्त फंड तयार करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी योजना दरवेळी 5 वर्षांच्या कालावधी साठी पुढे वाढवू शकता.

संपूर्ण योजना सविस्तर :
समजा तुम्ही तुमचे पी पी एफ खाते 25-30 वर्षे वय असताना उघडले आहे आणि 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये ते तीनदा वाढवले ​​आहे, तर तुम्ही निवृत्तीपूर्वी 30 वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी सहज पूर्ण केला असेल. ह्याचा अर्थ तुमची पी पी एफ मध्ये एकूण गुंतवणूक तीस वर्ष कालावधीसाठी झाली असेल. जर तुम्ही PPF मध्ये 30 वर्षांसाठी दर महिन्याला रु. 12,500 जमा करायला सुरुवात केली तर, 25-30 वर्षांनंतर 7.1 टक्के चक्रवाढ व्याजदराने मॅच्युरिटी रक्कम रु. 1.54 कोटी रुपये होईल. 1.54 कोटींपैकी 45 लाख रुपये तुमची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित 1.09 कोटी रुपये 30 वर्षांच्या कालावधीसाठी व्याज म्हणून मिळालेला परतावा असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF investment scheme best return with benefit on 25 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x