22 January 2025 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

PPF investment | घरबसल्या उघडा पीपीएफ खाते, गुंतवणूक करा आणि कर सवलतीसह मिळवा जबरदस्त आर्थिक फायदे

PPF investment

PPF investment | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाइन पीपीएफ खाते उघडण्याची सेवा देते.आजच तुमचे पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करा आणि जबरदस्त कर सवलत मिळवा. ही सुविधा सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांमधून तसेच पोस्ट ऑफिसमधूनही मिळते.

ठळक मुद्दे :
१) ग्राहकांना कर सवलत मिळवण्याची उत्तम संधी
२) सुरक्षित गुंतवणुकीचे संधी मिळेल
३) पीपीएफमध्ये गुंतवणूकीवर चक्रवाढ व्याज परतावा

आर्थिक भविष्य सुरक्षित आणि समृद्ध :
तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित आणि समृद्ध राखण्यासाठी पीपीएफ गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. ह्या योजनेअतर्गत तुम्हाला कर सवलत आणि इतर लाभ हवे असतील तर पीपीएफ मध्ये गुंतवणूक करणे तुमच्या साठी उत्तम पर्याय असेल. ह्या योजनेत प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला कर लाभ आणि कर्ज घेण्याची संधी देखील देते. यात गुंतवणूक केल्याने, मिळणारा परतावा, मुदतपूर्तीची रक्कम आणि एकूण व्याज परतावा पूर्णपणे करमुक्त आहे. या योजनेत, तुम्हाला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1,50,000 च्या गुंतवणुकीवर कर सवलत लाभ देखील मिळेल. एवढेच नाही तर तुम्ही घरी बसल्या या योजनेत सहज गुंतवणूक करू शकता.

PPF योजनेचे बंपर फायदे :
सध्या तुम्हाला PPF खात्यावर 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज परतावा मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, पीपीएफमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने चक्रवाढ व्याज परताव्याचा जबरदस्त फायदा मिळतो. म्हणजेच तुम्हाला येथे अतिरिक्त फायदे मिळतील. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना पीपीएफ योजना खाते ऑनलाइन उघडण्याची सेवा देते. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

आवश्यक कागदपत्र :
पीपीएफ योजनेत खाती उघडण्यासाठी, तुमच्याकडे नावनोंदणी अर्ज, पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्डची प्रत,ओळखपत्र पुरावा आणि रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे. बँकेच्या केवायसी नियमांनुसार, खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे वरील सर्व कागदपत्रे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय मध्ये पीपीएफ खाते उघडण्याची प्रक्रिया सांगणार आहोत.

एसबीआयमध्ये पीपीएफ खाते उघडण्याची प्रक्रिया :
१) प्रथम SBI नेट बँकिंग पोर्टल : onlinesbi.com वर जाऊन लॉग इन करा.
२) आता ‘Request and Enquiries’ या टॅबवर क्लिक करा आणि ‘New PPF Account’ पर्यायावर क्लिक करा.
३) ‘पीपीएफ खात्यासाठी अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करा.
४) स्क्रीनवर तुम्हाला, तुमचे नाव, पॅन क्रमांक आणि पत्ता यासारखे आवश्यक तपशील भरावे लागतील.
५) ज्या बँकेत योजना खाते उघडायचे आहे त्या बँकेच्या शाखेचा कोड टाका.
६) आता तुमचा भरलेला सर्व तपशील बरोबर आहे की नाही तपासा आणि त्याला सेव्ह करा आणि सबमिट करा.
७) तुम्हाला एक ओटीपी क्रमांक मिळेल जो तुम्हाला टाकावा लागेल आणि फॉर्म प्रिंट करण्यासाठी ‘Print PPF Account Online Application’ ya पर्यायवर क्लिक करा.
८) तुमचे केवायसी कागदपत्रे आणि छायाचित्रांसह 30 दिवसांच्या आत बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या. एसबीआय नियमानुसार खाते उघडण्याचा अर्ज तीस दिवसाच्या आत सबमिट केला नाही तर अर्ज सबमिट केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांनंतर रद्द केला जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Tittle | PPF investment scheme provided by State bank of india benefit on 27 July 2022.

हॅशटॅग्स

#PPF(43)#PPF Investment(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x