6 November 2024 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

PPF Scheme | फक्त 417 रुपये जमा करून करोडमध्ये परतावा घ्या, पोस्ट ऑफिसची ही योजना पैसे अनेक पटीने वाढवेल

PPF scheme

PPF Scheme | पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक योजना या भारतातील मध्यमवर्गीय पगारदार लोकांचे सर्वात जास्त पसंतीचे गुंतवणूक पर्याय आहे. हे गुंतवणूक पर्याय बंपर परताव्यासह सुरक्षित गुंतवणूकीची हमी देखील देतात. शेअर मार्केटमध्ये भरघोस परतावा कमावण्याच्या अनेक संधी असल्या तरी त्यात जोखीम ही आहे. मात्र आपण नेहमी सुरक्षित गुंतवणुक पर्याय शोधत असतो. जर तुम्हाला चांगला परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ही स्कीम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेत थोडी रक्कम जमा करून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता, आणि दीर्घकाळात लक्षणीय परतावा मिळवू शकता.

पोस्ट ऑफीस PPF योजना :
ही योजना तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि हमी परतावा हे दोन्ही फायदे मिळवून देते. पोस्ट ऑफिस PPF योजनेत गुंतवणूकदार बिना जोखीम पैसे जमा करू शकतात. हा एक विचारात घेण्यासारखा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे, कारण त्यात नियमित गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घकाळात उच्च परतावा मिळू शकतो. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशावर निश्चित व्याज दराने परतावा मिळेल अशी हमी दिली जाते. ज्या वेळी तुम्ही गुंतवणूक सुरू करता, त्याच दराने तुम्हाला परतावा दिला जाईल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त एकल खाते उघडता येते. तुम्ही संयुक्त खाते उघडून गुंतवणूक करू शकत नाही, कारण या योजनेत एका वर्षात गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि त्यावर खातेदाराला टॅक्स मध्ये सूट देखील दिली जाते. ही योजना तुम्हाला तुमच्या अल्पवयीन मुलांच्या वतीने खाते उघडून गुंतवणूक करण्याची परवानगी देते.

किमान गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
पोस्ट ऑफिस PPF योजनेच्या नियमांनुसार NRI व्यक्ती यात गुंतवणूक करण्यास अपात्र आहे. जर समजा एखादा भारतीय व्यक्ती योजना चालू असताना एनआरआय बनला तर तो या योजनेचे लाभ घेण्यास पात्र असेल. PPF मध्ये किमान रक्कम गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला दीर्घकाळात एक कोटी रुपये परतावा मिळू शकतो. जर तुम्ही 25 वर्षांसाठी PPF खात्यात दररोज 417 रुपये गुंतवणूक करत राहिलात तर मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष निश्चित करण्यात आला आहे, मते तुम्ही दर 5 वर्षांच्या कालावधीसाठी दोन वेळा कालावधी वाढवू शकता. शिवाय, या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलत देखील मिळू शकते. हा योजनेत गुंतवणुक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारा व्याज परतावा चक्रवाढ व्याज पद्धतीने दिला जातो.

PPF रिटर्न कॅल्क्युलेटर :
15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत जर तुम्ही दर महिना 12,500 रुपये प्रमाणे दररोज 417 रुपये गुंतवले तर 15 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये जमा होईल. या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यास वार्षिक 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. 15 वर्ष दर महिना 12500 रुपये जमा करत राहिल्यास तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख असेल आणि त्यावर तुम्हाला 18.18 लाख रुपये व्याज परतावा म्हणून दिला जाईल. 15 वर्षाची मुदत संपल्यानंतर तुम्ही 5-5 वर्ष असे दोन वेळा मुदत वाढवू शकता. दोन वेळा मुदत वाढवल्यास तुम्हाला एकूण 1.03 कोटी रुपये परतावा मिळेल. या परिस्थितीत तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख होईल आणि त्यावर तुम्हाला व्याज परतावा म्हणून 65.58 लाख रुपये मिळतील. अशा पद्धतीने PPF मध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात 1.03 कोटी रुपये परतावा कमवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF scheme by India Post office for huge returns on investment on 15 November 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x