PPF Scheme | पीपीएफच्या या योजनेत 7500 रुपये गुंतवा आणि संयम पाळा, करोडमध्ये परतावा कसा मिळेल पहा
PPF Scheme | आयुष्यात करोडपती होण्याची सर्वांची इच्छा असते. त्यासाठी आपण योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक केली पाहिजे. तुम्हालाही करोडपती व्हायचे असेल तर तुम्हीही आज पासून योग्य ठीकणी चांगल्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक सुरू केली पाहिजे. आज आपण या लेखात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF जिला आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणूनही ओळखतो याची पूर्ण माहिती घेणार आहोत. PPF मध्ये तुम्हाला जास्त मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची गरज नाही, तुम्ही छोटी गुंतवणूक करून देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.
पीपीएफ योजना : तुम्हालाही PPF योजनेमध्ये गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर, तुम्ही छोटी रक्कम गुंतवून देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी जास्त रक्कम जमा करण्याची गरज नाही. दर महिन्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये 100 रुपये जमा करूनही तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. PPF योजनेचा खास फायदा असा आहे की, या योजनेत जर तुम्ही नियमित गुंतवणूक करत राहिलात, तर निवृत्ती वयाच्या तुम्ही करोडपती होऊ शकता.
दीर्घकालीन गुंतवणूकीचा फायदा :
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी एक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारा पर्याय आहे. या योजनेमध्ये नियमित गुंतवणूक केल्यास तुझी चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळवू शकता. पीपीएफ योजनेमध्ये तुम्ही एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपये, म्हणजेच दर महिन्याला 12,500 रुपये गुंतवणूक करू शकता. PPF योजना ही दीर्घकालीन गुंतवणुकीचे लक्ष असलेल्या लोकांसाठी आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे संयम असणे आवश्यक आहे.
7.1 टक्के व्याज परतावा :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकार द्वारे संचालित एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. सध्या भारत सरकार पीपीएफ खात्यावर ठेवीदारांना 7.1 टक्के वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेमध्ये तुम्ही कमाल 15 वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या योजनेत दर महिन्याला 12500 रुपयेची गुंतवणुक केली तर 15 वर्षांनी तुम्हाला 7.1 टक्के व्याजदराने 40,68,209 रुपये परतावा मिळेल. या योजनेतील 15 वर्षाची एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला मिळणारा व्याज परतावा 18,18,209 रुपये असेल
PPF योजनेत गुंतवणूक करून तुम्ही एक कोटी रुपये कसे कमवू शकता, काही उदाहरणाने समजून घेऊ
प्रकरण क्रमांक :1
या प्रकरणात समजा तुमचे वय 30 वर्षे असून तुम्ही PPF योजनेत गुंतवणूक सुरू केली आहे, तुम्ही दर महिन्याला या योजनेत 12500 रुपये जमा करत आहात. या परिस्थितीत तुमची 20 वर्षांनंतर गुंतवणूक रक्कम 66,58,288 5 रुपये असेल. जेव्हा तुम्ही 20 वर्षांचा परतावा मिळवाल, तेव्हा गुंतवणूक आणखी 5 वाढवा, म्हणजेच एकूण 25 वर्षानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम 1,03,08,015 ( एक कोटी) असेल. तर या पद्धतीने गुंतवणूक करून तुम्ही करोडपती होऊ शकता. तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी पीपीएफमध्ये दरमहा 12500 रुपये गुंतवून 25 वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हाल. PPF खात्याची कमाल मुदत 15 वर्षे असते. PPF खाते 15 वर्षांनंतर पाच वर्षाच्या पटीत पुढे वाढवता येतात.
प्रकरण क्रमांक : 2
जर तुम्हाला PPF योजनेत 12500 रुपयांऐवजी थोडी कमी रक्कम गुंतवायची असेल, परंतु वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल, तर तुम्हाला लवकर गुंतवणूक सुरू करावी लागेल. समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी PPF खात्यात दर महिन्याला 10,000 रुपये जमा करायला सुरुवात केली, तर 7.1 टक्के व्याज दारानुसार 15 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 32,54,567 रुपये असेल. जी योजनेचा कालावधी तुम्ही आणखी 5 वर्षांसाठी वाढवला तर 20 वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 53,26,631 रुपये असेल. ते पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवले तर 25 वर्षांनंतर गुंतवणुकीचे मूल्य 82,46,412 रुपये असेल. असे आणखी एकदा योजनेची मुदत वाढवली तर 30 वर्षांनंतर गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1,23,60,728 कोटी रुपये झाले असेल. म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही करोडपती झालेले असाल.
प्रकरण क्रमांक : 3
समजा तुम्ही 10,000 रुपयांऐवजी फक्त 7500 रुपये गुंतवणु केले तर वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला तुम्हाला वयाच्या 20 व्या वर्षीपासून गुंतवणूक सुरू करावी लागेल. समजा जर तुम्ही PPF मध्ये दर महा 7500 रुपये 7.1 टाकले व्याज दराने 15 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 24,40,926 रुपये असेल. 5 वर्षाचा कालावधी वाढवला तर 20 वर्षांनंतर ही गुंतवणूक रक्कम 39,94,973 रुपये झाली असेल. आणखी एकदा 5 वर्षे कालावधी वाढवला तर 25 वर्षानंतर ही गुंतवणूक रक्कम 61,84,809 रुपये होईल. 5 वर्षे कालावधी आणखी वाढवला तर 30 वर्षांनी ही गुंतवणूक रक्कम 92,70,546 रुपये होईल. आणि 35 वर्षांनंतर गुंतवणूक रक्कम 1,36,18,714 रुपये होईल. या पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्ही 55 वर्षांचे असताना, एक कोटी पेक्षा अधिक परतावा मिळवू शकता. या योजनेत गुंतवणूक करून श्रीमंत होण्याचे गुपीत म्हणजे PPF योजनेत गुंतवणूक करून चक्रवाढ व्याजाचा फायदा घेणे, लवकर गुंतवणूक सुरू करणे आणि संयमाने नियमित गुंतवणूक करत राहणे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| PPF scheme investment plan and long term investment benefit 21 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा