17 April 2025 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज शेअर जबरदस्त तेजीत, IOC मध्ये मोठी भागीदारी, भरघोस खरेदीला सुरुवात

Praj Industries Share Price

Praj Industries Share Price | भारतातील जैवइंधन उत्पादन क्षमता बळकट करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीसह प्राज इंडस्ट्रीज कंपनीने करार केला आहे. या सकारात्मक बातमीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Praj Share Price)

प्राज इंडस्ट्रीज कंपनी इथेनॉल तंत्रज्ञान समाधाने आणि जैव इंधन तंत्रज्ञान सेवा प्रदान करणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. प्राज इंडस्ट्रीज कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सोबत केलेल्या सामंजस्य करारांतर्गत विविध जैव इंधनांमध्ये शाश्वत विमान इंधन, इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायो-गॅस, बायोडिझेल, बायो- बिटुमेन यासारख्या उत्पादने सामील आहेत. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 7.66 टक्के वाढीसह 399.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ऑक्टोबर 2021 मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि प्राज इंडस्ट्रीज या दोन्ही कंपन्यांनी जैवइंधन उत्पादन क्षमता बळकट करण्यासाठी 50:50 भागीदारीत संयुक्त उपक्रम उभारण्यासाठी करार केला होता. काल हा स्टॉक 380 रुपये किमतीवर खुला झाला तर, दिवसभरात शेअरची किंमत 405.90 रुपयेवर पोहचली होती. प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने 2023 वर्षात 11 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. दरम्यान शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन ऑइल कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

प्राज इंडस्ट्रीज कंपनीने माहिती दिली की, या वर्षी मे 2023 महिन्यात इंडियन ऑइल कंपनी आणि प्राज कंपनीने भारतातील पहिले व्यावसायिक प्रवासी उड्डाणमध्ये वापरण्यासाठी स्वदेशी शाश्वत विमान इंधन बनवण्यासाठी AirAsia India सोबत भागीदारी केली आहे. प्राज इंडस्ट्रीज कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीने 19 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. ज्या लोकांची नावे रेकॉर्ड तारखेला रजिस्ट्रारमध्ये असतील, त्यांना कंपनी लाभांश वाटप करेल.

तज्ञांच्या मते पुढील काळात प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 487 रुपये किमतीवर पोहोचू शकतात. तज्ञांनी प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची सरासरी लक्ष्य किंमत 487 रुपये निश्चित केली आहे. सध्याच्या बाजारभावापेक्षा शेअरची लक्ष किंमत 21 टक्के वाढची संभाव्यता दर्शवते. प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकवर 6 तज्ञांनी ‘स्ट्राँग बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. तांत्रिकदृष्ट्या प्राज इंडस्ट्रीज स्टॉकचा RSI 42.9 अंकावर आहे. तर MACD इंडेक्स 1.4 आंकावर आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Praj Industries Share Price today on 08 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Praj Industries Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या