18 November 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
x

Praj Industries Share Price | अरे बापरे! काल प्राज इंडस्ट्रीज शेअरने 1 दिवसात 15% परतावा दिला, आज नेमकं काय झालं? खरेदी करावा?

Praj Industries Share Price

Praj Industries Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजीत धावत होता. आणि काही कंपन्याचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. यात प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 598.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवारी शेअर 4.87% घसरीसह 562.85 रुपयांवर ट्रेड करत आहे.

प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 15 टक्के वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैवइंधनाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकरित्या ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

या आघाडीत जगभरातील 19 देश आणि 12 जागतिक संघटना सदस्य असणार आहे. जैव इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणे हा या ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सचा मुख्य उद्देश असेल. याशिवाय सर्व सदस्य देश मिळून राष्ट्रीय जैवइंधन कार्यक्रमांवर तांत्रिक सहाय्य करतील आणि जैवइंधनावर आणखी भर देतील.

भारत सरकारच्या जैवइंधनाबाबत नवीन धोरणाचा प्राज इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांना मोठा फायदा होईल. म्हणून सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावत होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 440 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 107 रुपयेवरुन वाढून 598 रुपये किमतीवर पोहोचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Praj Industries Share Price today on 12 September 2023.

हॅशटॅग्स

Praj Industries Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x