18 November 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
x

Praj Industries Share Price | 20 पैशाच्या प्राज इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 3667 टक्के परतावा दिला, फायद्याच्या शेअरची अजून खरेदी सुरु

Highlights:

  • Praj Industries Share Price
  • प्राज इंडस्ट्रीज शेअरने 52 आठवड्यांची उच्चांक पातळी
  • नफ्यात वार्षिक 53 टक्क्यांची वाढ
  • इंडियन ऑइल कंपनी सोबत व्यापारी करार
Praj Industries Share Price

Praj Industries Share Price | एके काळी प्राज इंडस्ट्रीज या बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स शेअर 20 पैसेवर ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीच्या शेअरची किंमत 386 रुपयेवर पोहोचली आहे. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3667 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 14 जुलै 1995 हा स्टॉक 10.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 17 सप्टेंबर 2001 रोजी शेअरची किंमत 20 पैशांवर आली होती.

प्राज इंडस्ट्रीज शेअरने 52 आठवड्यांची उच्चांक पातळी

प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने 11 ऑक्टोबर 2022 रोजी 461.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.79 टक्के वाढीसह 374.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नफ्यात वार्षिक 53 टक्क्यांची वाढ

25 मे रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीने चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 88.12 कोटी रुपये नफा कमावला आहे. कंपनीच्या नफ्यात वार्षिक 53 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 57.65 कोटी रुपये नफा कमावला आहे. समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचे उत्पन्न महसूल 1,003,98 कोटीवर पोहचले आहेत. जे FY22 च्या Q4 मधील 830.96 कोटी रुपयेच्या तुलनेत 21 टक्क्यांनी अधिक आहे.

कंपनीचा ऑपरेटिंग EBITDA 38.8 टक्क्यांनी वाढून 108.3 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2023 साठी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 4.50 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे सीईओ आणि एमडी शिशिर जोशीपुरा आहेत.

इंडियन ऑइल कंपनी सोबत व्यापारी करार

प्राज इंडस्ट्रीज कंपनीने इंडियन ऑइल कंपनी सोबत व्यापारी करार केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने विविध प्रकारच्या जैवइंधनाच्या उत्पादनासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. विमान इंधनाचे उत्पादन करणे हा या संयुक्त उपक्रमाचा पहिला टप्पा असेल.

स्वदेशी विमान इंधन बनवण्याच्या हेतूने या उपक्रम अंतर्गत AirAsia India आणि IOCL सोबत हातमिळवणी केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, IOCL कंपनीने पानिपत या ठिकाणी 2G प्लांट यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे. या युनिट मधून उत्पादित पहिले इथेनॉल इंधन वितरित केले गेले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Praj Industries Share Price today on 27 May 2023.

हॅशटॅग्स

Praj Industries Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x