18 November 2024 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
x

Prakash Steelage Share Price | परताव्याचा प्रकाश टाकतोय 5 रुपये 50 पैशाचा पेनी शेअर, शेअर एकदिवसात 20% परतावा देत अप्पर सर्किटवर

Prakash Steelage Share price

Prakash Steelage Share Price | चालू आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रकाश स्टीलेज कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मात्र प्रकाश स्टीलेज या कंपनीचा पेनी स्टॉक सुसाट तेजीत धावत होता. शुक्रवारी एका दिवसात प्रकाश स्टीलेज कंपनीचे शेअर्स 19.57 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

काल सकाळी शेअरची सुरुवात 10 टक्के वाढीसह 4 रुपयेवर झाली होती आणि दिवसा अखेर हा स्टॉक 19.57 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. यावरून कळते की, गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. प्रकाश स्टीलेज या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6.81 रुपये होती. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाश स्टीलेज कंपनीचे शेअर्स 19.57 टक्के वाढीसह 5.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तिमाही निकाल तपशील :

प्रकाश स्टीलेज कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत प्रकाश स्टीलेज कंपनीने 21.02 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून 2023 तिमाहीत प्रकाश स्टीलेज कंपनीने 1.89 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या तुलनेत प्रकाश स्टीलेज कंपनीने निव्वळ नफ्यात 1012.62 टक्के वाढ नोंदवली आहे. जून 2023 तिमाहीत या कंपनीने 29.04 कोटी रुपये विक्री साध्य केली आहे.

मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीच्या तुलनेत जून 2023 मध्ये कंपनीच्या विक्रीत 73.69 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत प्रकाश स्टीलेज कंपनीने 16.72 कोटी रुपयेची विक्री साध्य केली होती. या तिमाहीमध्ये कंपनीचा EBITDA 21.33 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या जून तिमाहीच्या कंपनीचा EBITDA 901.41 टक्के वाढला आहे.

व्यवस्थापन फेरबदल :

प्रकाश स्टीलेज कंपनीने नुकताच आपल्या व्यवस्थापन मंडळात काही फेरबदल केले आहेत. या कंपनीने नुकताच राजेश कुमार अग्रवाल यांना 10 ऑगस्ट 2023 ते 09 ऑगस्ट 2028 पर्यंत 5 वर्षांसाठी अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त केले आहे.

यासह, कमल पी कानुगो यांना पुढील 5 वर्षांसाठी पूर्ण वेळ अतिरीक्त संचालक म्हणून नियुक्त केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Prakash Steelage Share price today on 12 August 2023.

हॅशटॅग्स

Prakash Steelage Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x