Pre Approved Personal Loan | प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन कोणाला मिळतो आणि त्याचे काय फायदे माहिती आहेत?

Pre Approved Personal Loan | सण सणावळ आली की सगळीकडे एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. अनेक जण या काळात दागिणे, वस्तू, कपडे खरेदी करतात. सणांमध्ये आपला खर्च हा नेहमीपेक्षा जास्तच असतो. त्यामुळे दिवाळसणाला खर्चासाठी बोनस देखील दिला जातो. यासह अनेक वित्त संस्था आणि बॅंका आपल्या कस्टमरसाठी विविध ऑफर देत असतात. अशात या काळात काही नविन सुरू करण्याचा विचार करणा-यांना मोठ्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते.
त्यामुळे बॅंक आपल्या विश्वासू ग्राहकांना पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज (प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन) मंजूर करते. पर्सनल लोन असल्याने या पैशांचा तुम्ही तुम्हाला हवा तेथे वापर करू शकता. मात्र असे कर्ज घेने सुरक्षित आहे का? तसेच बॅंक हे कर्ज नेमके कोणाला देते? अशा काही प्रश्नांची माहिती आज जाणून घेणार आहोत.
कोणाला मिळते ही ऑफर
ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर जास्त चांगला आहे आणि बॅंकेतील रेकॉर्ड देखील उत्तम आहे अशाच व्यक्तींना पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज दिले जाते. यामध्ये बॅंक तुमची सध्याची कमाई आणि सध्याचे तसेच मागिल कर्जाची परतफेड करतानाचा रेकॉर्ड तपासत असते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर बॅंक तुम्हाला या कर्जासाठी ऑफर करू शकते.
तज्ज्ञ या कर्जाची महिती देताना म्हणतात की, “ पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज देताना सर्वात आधी तुमचा कर्जासाठी असलेला इतिहास तपासते. तुम्ही वेळेत कर्जाची परतफेड करत असाल. तुम्ही कोणताही हप्ता थकवलेला नसेल तर बॅंक तुम्हाला या कर्जाची ऑफर देते. यात क्रेडिट स्कोर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. जेव्हा बॅंक तुम्हाला हे कर्ज देते तेव्हा तुम्हाला देखील ते वेळेत फेडावे लागते. यात विलंब करून चालत नाही. मुळात हे कर्ज आधिच मिळालेले असते त्यामुळे त्याचा कसा वापर करायचा याचाही निट विचार करता येतो.”
प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनचे फायदे
हे कर्ज मिळाल्याने तुम्हाला इतर कर्जाच्या तुलनेत चांगला व्याज दर दिला जातो. बॅंकेला तुमचा क्रेडिट स्कोर आधिच माहीत असतो. शिवाय त्याला केवायसीचा एक्सेस असतो. त्यामुळे हे कर्ज मिळवताना फार वेळ लागत नाही. बॅंक लगेचच कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करते. अनेक बॅंका हे कर्ज देताना झिरो प्रक्रीया शुल्क, झिरो फोरक्लोजर शुल्क, झिरो प्री-पेमेंट शुल्क अशा ऑफर देखील देतात. याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. याशिवाय हे कर्ज मिळवताना तुम्हाला बॅंकेच्या अनेक वा-या करण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही तुमच्या फोन मधून सुध्दा या कर्जासाठी अर्ज करू शकता. यात व्याजाचा दर देखील कमी असतो.
हे कर्ज स्विकारावे की नाही
कर्ज स्विकारण्याचा सर्वस्वी निर्णय तुमचा असतो. मात्र कमी व्याजदरात कर्ज मिळत आहे या कारणासाठी तुम्ही ते घेत असाल तर तसे करू नये. कारण यात तुम्हाला फार कमी वेळ असतो. त्यामुळे हे पैसे नेमके खर्चायचे आहेत याचे नियोजन तुमच्याकडे असेल तेव्हाच तुम्ही हे कर्ज घ्यावे. जर तुम्ही काही कारणासाठी आधिच कर्जाचा विचार करत असाल आणि बॅंक तुम्हाला ही ऑफर देत असेल तर तुम्ही हे कर्ज स्विकारू शकता.
यात विविध अटी आणि शर्थी असतात. त्यामुळे या सर्व अटी काळजीपूर्वक वाचा आणि मगच ते स्विकारा. तसेच हे कर्ज घेताना त्याची परतफेड देखील मर्यादीत वेळेत करायची आहे याचे भान ठेवा. बॅंक जेव्हा तुम्हाला यासाठी ऑफर करते तेव्हा सर्व नियमांची आणि कालावधीची निट माहीती मिळाल्यावरच कर्ज घ्या. असे केल्याने तुम्ही घेतलेले कर्ज तुम्हाला फायद्याचे ठरेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Pre Approved Personal Loan Who gets a pre-approved personal loan and what are its benefits 08 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL