24 January 2025 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | 90% पुरुष मंडळींना माहित नाही, मुलींना लग्नानंतर वडिलांची संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा IREDA Share Price | इरेडा शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA 8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये 186 टक्क्यांनी वाढ होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK
x

Pricol Share Price | अल्पवधीत 1200% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, पुन्हा मालामाल करणार

Pricol Share Price

Pricol Share Price | प्रिकॉल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1,200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ( प्रिकॉल लिमिटेड कंपनी अंश )

प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे भारतात कोईम्बतूर, मानेसर, पंतनगर, पुणे, सातारा आणि श्री सिटी याठिकाणी आणि जकार्ता, इंडोनेशियामध्ये उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत. याशिवाय कंपनीने टोकियो, सिंगापूर आणि दुबई येथे 3 आंतरराष्ट्रीय कार्यालय स्थापन केले आहेत. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 406.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 211.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 90 टक्क्यांनी वाढले आहेत. ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थ कॅपिटल फर्मने प्रिकॉल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 465 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या प्रिकॉल लिमिटेड कंपनी क्लस्टर मेकॅनिकलकडून डिजिटल होण्याकडे वाटचाल करत आहे. सध्या प्रिकॉल लिमिटेड कंपनीला ॲक्ट्युएशन कंट्रोल अँड फ्लुइड मॅनेजमेंट सिस्टीमच्या निर्यातीत मंदीचा सामना करावा लागत आहे.

मोनार्क फर्मच्या मते, “ईव्ही उत्पादनांमधून प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे महसूल योगदान लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे. या कंपनीने आपल्या व्यवसायात प्रगत टेलिमॅटिक्स आणि ई-कॉकपिट सारखे एकात्मिक उपाय डीआयएस विभागात जोडण्याची योजना आखली आहे. शिवाय ही कंपनी इलेक्ट्रिक कूलंट पंप, इलेक्ट्रिक ऑइल पंप, डिस्क ब्रेक आणि बॅटरी व्यवस्थापन प्रणाली देखील बनवण्याचा प्रयत्न करत आहे”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pricol Share Price NSE Live 06 April 2024.

हॅशटॅग्स

Pricol Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x