17 April 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

KharediKhat | तुमच्या कौटुंबिक जमिनीच्या मालकीचा पुरावा गरजेचा, जमिनीच्या व्यवहाराचे खरेदीखत कसे मिळवायचे लक्षात ठेवा

KharediKhat

KharediKhat | जमिनीचे व्यवहार करताना इतर कागदपत्रांप्रमाणे खरेदीखत देखील लागते. यात शेत जमिनीपासून ते एखादे घर किंवा जमिनीशी संबंधीत कोणतीही मालमत्ता विकत घेताना याची विचारना केली जाते. मात्र आजही अनेक व्यक्तींना खरेदी खत काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे जमिनीचे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक होते. तुम्हाला देखील खरेदीखताविषयी माहिती नसेल तर ही बातमी पूर्ण वाचा.

खरेदी खत म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही एखादी जमिन विकत घेता तेव्हा त्यावर झालेला करार पूर्ण केल्यास खरेदीखत काढता येते. यात मालकाने संबंधीत जमिन खरेदी करणा-या व्यक्तीला संपूर्ण रक्कम घेऊन जमिन खरेदी करणा-याच्या ताबात दिल्यावर याची प्रक्रिया सुरू होते. म्हाणजे व्यवहार पूर्ण झाल्याचा पूरावा दाखवणारा कागद यालाच खरेदी खत म्हणता येईल.

असे मिळवा खरेदीखत
यात तुम्हाला आधी मुद्रांक शुल्क काढून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्या शहरात अथवा गावात जमिन आहे तेथिल दुय्यम निबंधक कार्यालयात मार्केटमध्ये जो रेट सुरु आहे त्या प्रमाणे मुद्रांक शुल्क काढून मिळते. दुय्यम निबंधक हे कामकाज पाहतात. त्यानंतर दुय्यम निबंधक तुम्हाला खरेदी खतासाठी लागणारे कागदपत्र आणि शुल्क यांची माहिती देतात. यामध्ये पुढे मुद्रांक शुल्कावर जमिन मालकाचे नाव, खरेदीदार आणि विक्रेता यांचे प्रयोजन, जमिनीचा प्रकार, जमिनीचे क्षेत्र ही माहिती नमुद करावी लागते.

खरेदी खतासाठी लागणारी कागदपत्रे
खरेदीखत तयार करताना तुमच्याकडे सात बारा, आठ अ, मुद्रांक शुल्काची पावती, फेरफार प्रतिज्ञापत्र, दोन जवळिल व्यक्तींचे फोटो आणि एनए ऑर्डरची प्रत ही कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यानंतर कागदपत्रे पडताळून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदनी केली जाते.

फसवणूक होण्याची शक्यता
खरेदीखताविषयी सातत्याने नियम बदलले जात आहेत. हे नियम जिल्हाधीकारी बदलत असतात. त्यामुळे खरेदीखत बनवताना नियम एकदा स्वत: पाहून घ्या. एकदा खरेदीखत बनवले तर ते लवकर रद्द होत नाही. ते रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. त्यामुळे जमिन विकत घेत असलेल्या व्यक्तीने संपूर्ण रक्कम भरल्यावरच खरेदीखत बनवा. कारण एकदा हे बणवले की, त्यावरील तुमचा मालकी हक्क संपत असतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Property KharediKhat application process check details 16 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

KharediKhat(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या