18 November 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Property Tax | तुमच्याकडे स्वतःच घर आहे? त्यावर टॅक्स भारत? मालमत्ता करासंबंधी हे नियम लक्षात ठेवा, अन्यथा...

Property Tax

Property Tax | घर खरेदीचे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो. यात तुम्हाला पैशांची मोठी गुंतवणूक करावी लागते. पुर्वी गावाहून नोकरीच्या शोधात मुंबईत अलेली माणसे चाळीत राहणे पसंत करत होते. मात्र आता बदलत्या लाईफस्टाइल मुळे सर्वजण फ्लॅट खरेदी करताना दिसतात. जेव्हा आपण कोणतीही मालमत्ता खरेदी करतो तेव्हा त्याच्या विषयीचे सर्व नियम आपल्याला माहित असणे गरजेचे असते. यासाठी तुम्हाला विविध कर देखील भरावे लागतात. मात्र अनेकांना घर खरेदी नंतरचे नियम माहित नसल्याने मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे.

कठोर पावले उचलण्याची शक्यता
जेव्हा आपण घर खरेदी करतो तेव्हा त्यासाठी लागणारा कर आपल्याला भरावा लागतो. जी व्यक्ती त्या मालमत्तेची खरी मालक असते तीलाच हा कर भरावा लागतो. महापालीका अधिकारी यांच्या अंतर्गत हा कारभार चालतो. त्यामुळे जर नियमीत मालमत्ता कर भरला नाही तर महापालिका कायदेशीर कारवाई करते. यात कराची थकबाकी जास्त असल्यास पालिकेकडून कठोर पावले उचलली जातात.

जास्तीचा दंड आकारला जातो
मालमत्ता कर संदर्भात कायदेतज्ञ सांगतात की, तुम्ही सलग कर भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागतो. तसेच हे नियमीत सुरू राहीले तर तुमचा दंड देखील वाढवला जातो. किती दंड आकारला जावा याचा निर्णय पालिका अधिकारी घेतात. यात दिल्ली महानगरपालिकेविषयी सांगायचे झाल्यास तिथे १ टक्के दंड आकारला जातो. तसेच बेंगळुरू येथे २ टक्के दंड आहे.

संधी देत पहिली नोटीस
जेव्हा तुम्ही मालमत्ता कर भरत नाही तेव्हा तुम्हाला त्याचे कारण विचारत एक नोटीस येते. यात तुम्हाला पालिकेत जाऊन तुमच्या अडचणी आणि त्यावर काही दिवसांची सवलत मिळू शकते. मात्र त्यानंतरही तुम्ही कर निट भरला नाही किंवा त्यापासून पळ काढला तर पालिका कोणतीही हयगय न करता योग्य ती कारवाई करते.

विविध ठिकाणची मालमत्ता येईल धोक्यात
जर तुम्ही वारंवार नोटीस बजावूनही काही उत्तर दिले नाही आणि कर भरला नाही तर तुमच्यावर कठोर कारवाई होते. यात कराची रक्कम तुमच्या बॅंक खात्यातून आणि मालमत्तेतून जमा केली जाते. डीएमसी कायदा १९५७ अंतर्गत कलम १५५ आणि कलम १५७ यांच्या आधारे नगदरपालिका महानगरपालिका अशी कारवाई करू शकते.

तुरुगांचीही खावी लागेल हवा
जर नोटीसकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला दंडावर २० टक्के जास्तीचा दंड आकारला जातो. यात तुमची जंगम मालमत्ता जप्त केली जाते. जर त्यातही कर वसूल होत नसेल तर तुमच्या चुकीसाठी पालिका तुम्हाला तुरूंगात आणू शकते. त्यामुळे वेळेत आपल्या मालमत्तेचा कर भरणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला देखील तुरूंगावस होऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Property Tax Imprisonment for non-payment of regular taxes these are the rules regarding property tax 1 November 2022.

हॅशटॅग्स

Property Tax(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x