17 April 2025 2:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Provident Fund Account Types | प्रॉव्हिडंट फंडाचे किती प्रकार आहेत? कोणत्या प्रकारात जास्त फायदा होतो पहा

Provident Fund Account Types

Provident Fund Account Types | प्रॉव्हिडंट फंडाबाबत अनेकांना माहिती असतेच, पण त्याबाबतही बराच गोंधळ उडतो. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) यांच्यातील फरकाबद्दल अनेक जण संभ्रमात असतात. त्याचबरोबर अनेक लोकांना कोणता पीएफ निवडणं जास्त चांगलं आहे हे समजत नाही. आता जेव्हा त्या विषयाबद्दल योग्य ज्ञान असेल, तेव्हाच हक्काची निवड करता येईल. बरं, तुम्हाला माहित आहे का की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) व्यतिरिक्त आणखी एक भविष्य निर्वाह निधी आहे. जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) असे त्याचे नाव आहे.

प्रॉव्हिडंट फंड योजनांचा उद्देश नोकरदार व्यक्तींसाठी रिटायरमेंट फंड तयार करणे हा असतो. याअंतर्गत नियमित गुंतवणूक केली जाते. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर चांगली रक्कम मिळते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही कर्मचाऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) आणि जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) यांचा समावेश आहे. एकूण प्रॉव्हिडंट फंडाचे 3 प्रकार आहेत. या तिघांमध्ये फरक आहे. सरकार या तिघांच्याही व्याजदरातही वेळोवेळी बदल करते.

तिघांमधील फरक
प्रॉव्हिडंट फंडावर प्रत्येक आर्थिक वर्षासाठी वार्षिक व्याजदर निश्चित केला जातो. त्याचबरोबर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडासाठी (पीपीएफ) व्याजदर दर तिमाहीला निश्चित केला जातो. याशिवाय एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडाचा (ईपीएफ) व्याजदर ईपीएफओ ठरवितो आणि त्याची मंजुरी अर्थ मंत्रालयाकडून घेतली जाते. त्याचबरोबर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही सरकारच्या अल्पबचत योजनांतर्गत येणारी योजना असल्याने त्याचे व्याज तिमाही आधारावर बदलते. त्याचबरोबर जनरल प्रॉव्हिडंट फंड हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतो. यावरील व्याजदरही तिमाही आधारावर निश्चित केला जातो.

ईपीएफ म्हणजे काय
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ) ही एक गुंतवणूक योजना आहे, जी प्रत्येक नोकरदार व्यक्तीला उपलब्ध आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) सर्व ईपीएफ खातेधारकांचे योगदान कायम ठेवते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही सर्व सरकारी व बिगर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूक योजना आहे. नियमानुसार, ज्या कंपनीत २० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात, त्या कंपनीला ‘ईपीएफओ’कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून कापली जाते. मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून जमा केली जाते. त्याचबरोबर कंपनीकडून १२ टक्के रक्कम दिली जाते, त्यातील ८.३३ टक्के रक्कम तुमच्या पेन्शन स्कीम (ईपीएस) खात्यात जमा होते आणि उर्वरित ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा होते. सध्या ईपीएफवर 8.65 टक्के व्याजही मिळतं.

पीपीएफ म्हणजे काय
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही एक अल्पबचत योजना आहे. हे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते. अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे हे एक साधन आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा केवळ कोणत्याही कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नाही. त्याऐवजी देशातील कोणताही नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतो. मुलांच्या नावानेही पीपीएफ उघडता येते. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज दिले जाते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणूक आयकर कलम ८० सी अंतर्गत येते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्यावर कर लाभ दिले जातात. मॅच्युरिटीच्या वेळीही कर भरावा लागत नाही.

जीपीएफ म्हणजे काय
जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) हा सरकारी काम करणाऱ्या लोकांसाठी असतो. सरकारी कर्मचारी आपल्या वेतनातील विशिष्ट भाग सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या स्वरूपात देऊन त्याचा सभासद होऊ शकतो. जनरल प्रॉव्हिडंट फंडात जमा झालेली रक्कम सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या वेळी मिळते. जनरल प्रॉव्हिडंट फंडात सध्या ७.१ टक्के व्याज दिले जाते. सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित केले, तर अशा परिस्थितीत तो जनरल प्रॉव्हिडंट फंडात जमा करू शकत नाही. जनरल प्रॉव्हिडंट फंड खाते कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या तीन महिने आधी बंद होते. सरकारी कर्मचाऱ्याने या बदल्यात अॅडव्हान्स लोन घेतले तर त्या बदल्यात त्याला व्याज द्यावे लागत नाही, तर कर्जाची रक्कम ईएमआयच्या स्वरूपात भरावी लागते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Provident Fund Account Types need to remember check details on o7 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या