17 April 2025 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Punjab & Sind Bank Share Price Today | या बँकेचा शेअर फक्त 35 रुपयांचा, गुंतवणूकदारांना 1 वर्षात 182% परतावा दिला, खरेदी करणार?

Punjab & Sind Bank Share Price

Punjab & Sind Bank Share Price Today | सार्वजनिक क्षेत्रातील ‘पंजाब अँड सिंध बँक’ ने मार्च 2023 च्या तिमाहीत 456.99 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘पंजाब अँड सिंध बँक’ च्या नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 32 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या मार्च 2022 तिमाहीत या सरकारी बँकेने 346.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

‘पंजाब अँड सिंध बँक’ बँकेने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 0.48 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 2.19 टक्के वाढीसह 35.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये ‘पंजाब अँड सिंध बँक’ बँकेने 1313.03 कोटी रुपये नफा कमावला आहे. पंजाब अँड सिंध बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 1.97 टक्क्यांनी घटले असून तिमाही आधारावर 15.05 टक्के कमी झाले आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न 683.78 कोटी रुपयेवर आले आहे. या बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत 6.97 टक्के होती, जी मागील तिमाहीत वाढून 8.36 टक्केवर पोहचली आहे.

या बँकेच्या निव्वळ अनुत्पादित मालमत्तामध्ये देखील किंचित प्रमाणात घट पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत बँकेचा NPA 1.84 टक्के आहे जो मागील तिमाहीत 2.02 टक्के नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये पंजाब अँड सिंध बँकचा नफा 26.3 टक्के वाढीसह 1313.03 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. FY22 मध्ये याच बँकेने 1039.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मार्च 2026 तिमाहील बँकेचे व्याज उत्पन्न 21049 कोटी रुपये होते. पंजाब अँड सिंध बँकेने मार्च 2023 च्या तिमाहीत 17.3 टक्के वाढीसह 2104.94 कोटी रुपये व्याज कमावला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत बँकेने 1793.29 कोटी रुपये व्याज उत्पन्न कमावला होता. 31 मार्च 2023 पर्यंत या बँकेच्या 1537 शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी 572 शाखा ग्रामीण भागात चालू असून 281 शाखा निमशहरी भागात काम करत आहेत. आणि 362 शाखा शहरी भागात आणि 322 शाखा महानगर भागामध्ये काम करत आहेत.

या बँकेच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 182 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 जून 2022 रोजी ‘पंजाब अँड सिंध बँक’ बँकेचे शेअर्स 13.25 रुपयेवर ट्रेड करत होते. तर 2 मे 2023 रोजी हा स्टॉक 37.35 रुपये किमतीवर पोहचला होता. पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 119 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 5 दिवसात या बँकेच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Punjab & Sind Bank Share Price Today on 04 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Punjab & Sind Bank Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या